Tuesday, June 28, 2022
Homeवर्धाजिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी स्विकारला पदभार

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी स्विकारला पदभार

सेवाग्राम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन

वर्धा :- जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदाचा नवीन जिल्हाधिकारी म्हणून प्रेरणा देशभ्रतार यांनी पदभार स्विकारला असून त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालायातील कार्यालये आणि परिसराची पाहणी केली. प्रेरणा देशभ्रतार या भारतीय प्रशासकीय सेवेतील सन 2010 च्या तुकडीतील प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणून काम करताना टिपेश्वर अभयारण्यातील गावांचे उत्कृष्ट पुनर्वसन केले. रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी , पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणूनही त्यांचा कार्यकाळ उल्लेखनीय होता. यशदाच्या उपमहाव्यवस्थापक आणि दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्त म्हणून त्यांनी कामगिरी सांभाळली आहे. सामाजिक जाणिवेतून काम करणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्विकारताच आज सकाळी प्रेरणा देशभ्रतार यांनी सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींना तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सेवाग्राम विकास आराखड्यातील विकास कामांची पाहणी केली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular