Saturday, June 25, 2022
Homeवर्धाजिल्हात राष्ट्रवादी संघटन मजबूत करणार - सुबोध मोहिते पाटील

जिल्हात राष्ट्रवादी संघटन मजबूत करणार – सुबोध मोहिते पाटील

आर्वी : बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन वर्धा जिल्हात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन एक नंबरवर आणणार असे मत माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रथमच वर्धा जिल्हात आगमन झाले. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.


यावेळी माजी जिल्हाध्यक्ष पवन तीजारे, दशरथ ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य नीतीन देशमुख, नीतीन शिंदे, विश्वनाथ मस्के, पवन दांडेकर, रोशन तेलंगे, योगिता मानकर, रोहीनी पाटील, नितीन आष्टीकर, राकेश एलचटवार, राहुल पोटे, जतीन रननवरे, एकनाथ डहाके, गुड्डू पठाण, रुपेश मस्के,सचीन हजारे, संजय धोंगडे, पप्पु कुकडे, राहुल भारती, बंडु मुळे, ओमप्रकाश ढवळे उपस्थित होते.
पुढे बोलताना मोहिते म्हणाले की, वर्धा जिल्हा हा गांधीजींचा जिल्हा असुन ज्या प्रकारे त्यांनी बहुजन समाजाला प्राधान्य देवून सोबत घेऊन आंदोलन केले त्याचप्रमाणे आपण सुद्धा जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन शेतकऱ्यांचे, महीलांचे, गरीबांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्ह्यांत एक नंबरवर आणणार असे मोहिते म्हणाले.
यावेळी आशीष लोखंडे, वेभव गांजे, राहुल हिंगे, पंकज भुजाडे, कपील मुन, निलकमल आखुड, छोटु भुजाडे व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular