Tuesday, June 28, 2022
Homeवर्धाजाम येथील व्यवसायिक सौ निखिता पटेल यांचे निधन

जाम येथील व्यवसायिक सौ निखिता पटेल यांचे निधन


तालुका प्रतिनिधी
समुद्रपूर
जाम येथील होटेल व्यवसायिक सनी पटेल यांच्या पत्नी सौ निखिता पटेल यांचे दुर्धर आजाराने आज पहाटे निधन झाले.


जाम येथील भुकेल्याना अन्न तहानलेल्या पाणी देण्याची व नागरिकांची सेवा करून रावजी भाई पटेल यांनी होटेल पेट्रोल पंप सूरु करून नागरिकांची सेवा सुरू केली होती त्यांचे पुत्र अशोकभाई पटेल यांनी सुद्धा तेच कार्य सुरू ठेवले होते परंतु अशोकभाई पटेल चे काही दिवसांअगोदर निधन झाले त्या नंतर हे कार्य त्यांचा मुलगा सनी पटेल व निखिता पटेल यांनी हे कार्य सुरू ठेवले होते परंतु काही दिवसां पासून त्यांना कर्करोगाने ग्रासले होते व त्यातच आज सकाळी 4 ,30 वाजता निधन झाले त्यांचे मागे पती,सासू, आजोबा, दोन मुले असा आप्त परिवार आहे
त्यांचे अंतसंस्कार जाम येथील मोक्षधाम वर संपन्न झाले यावेळी आमदार समीर कुनावार, यांचे अध्यक्षतेखाली ऍड सुधीर कोठारी, भुपेंद्र शहाणे यांचे उपस्थिततीत शोक सभा घेण्यात आली

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular