Monday, June 27, 2022
Homeवर्धाजय भवानी क्रिडा मंडळ तुळजापूर संघ विजयी

जय भवानी क्रिडा मंडळ तुळजापूर संघ विजयी


सेलू :- तालुक्यातील नानबर्डी येथिल मैत्री क्रिडा मंडळाच्या वतीने ५७ किलो वजन गटातील कबड्डी सामने नुकतेच पार पडले.या स्पर्धेत तुळजापूर वघाळा येथील जय भवानी संघाने प्रथम पारितोषिक मिळविले ,तर अमरावती येथील हनुमान व्यायाम शाळेने द्वितीय पारितोषिक मिळविले.

या स्पर्धेत ४२ संघानी भाग घेतला होता.जय भवानी क्रिडा मंडळ तुळजापूर हा संघ प्रथम पुरस्काराचा मानकरी ठरून १५ हजार रूपये रोख.व वैयक्तिक पुरस्कार देण्यात आला. व्दितीय पुरस्कार हनुमान व्यायाम शाळा पिंपरी (अमरावती)या संघाला १०हजार रूपये रोख.मैत्री क्रिडा मंडळ नानबरडी याला तिसरे पारितोषिक ७ हजार मिळविले, चोंथा पुरस्कार ५ हजार रूपये रोख न्यु जहाज क्रिडा मंडळ वघाळा या संघास देण्यात आला.
बक्षीस वितरणाच्या वेळी पत्रकार रवींद्र कोटंबकार.दप्तरी बंधू , मैत्री क्रिडा मंडळाचे कार्यकर्ते आणि क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular