सेलु :
सन् २०१७ पासुन सुरेश धोंडबा ठाकरे कुटुंब समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी शासन, प्रशासनाकडे वारंवार विनंती करीत पायपीट करुन थकल्याने अखेर मागील चार दिवसापासून आपल्या शेतातच सहकुटुंब तंबू टाकून न्याय मिळविण्यासाठी धरणे आंदोलनावर बसले आहे.

श्रीमती तानी धोंडबा ठाकरे हिच्या मालकी व
कब्ज्यातील सेलु तालुक्यातील वर्धा-नागपुर मार्गावर असलेल्या आमगाव (ख) या परिसरात शेत सर्वे नं. ६५
आराजी १.७९ हे.आर. जमीन आहे.यावरील मिळालेल्या उत्पन्नावर या कुटुंबाचा वर्षभराचा गाडा चालतो. यात जात असलेल्या जमीनीच्या आराजीपेक्षा अधिक जमीन सम्रुध्दी महामार्गात जात आहे असे या शेतकरी कुटुंबाचे म्हणणे आहे.आम्हाला भिक नको आहे फक्त आमच्या गेलेल्या शेत जमीनीचा योग्य मोबदला मिळावा हिच त्यांची अपेक्षा आहे. यातील एकंदरीत क्षेत्रापैकी सम्रुध्दि महामार्गात
संयुक्त मोजनी यादीनुसार ०.५३ हे.आर.जमीन जात असल्याचे तानी ठाकरे यांचा मुलगा सुरेश ठाकरे याचे म्हणने आहे.
प्रत्यक्ष मोक्यावर आराजी १.६० हे.आर शेत जमीनीपेक्षा जास्त जमीन सम्रुध्दि महामार्गात जात असल्याचे सुरेश ठाकरे याचे म्हणने आहे.परंतू संयुक्त मोजणी मधे शेत कमी जात असल्याचे दाखवून आमची लुबाडणूक केल्या जात आहे. हे यांना मान्य नाही.करिता संबंधीत अधिकार्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी अशा मागणी साठी संबंधित विभागाकडे दुरुस्तीसाठी लेखी अर्ज ही करण्यात आले.त्याकडे फक्त कानाडोळा करण्यात आले.परंतू काहीही निष्पन्न निघाले नाही.कारण ठाकरे यांचे नुसार जास्त शेत जमीन जात असल्याचा त्यांचा दावा आहे.त्यात त्यानुसार दुरुस्ती करावी याबाबत त्यांचेकडून अनेकदा मागणी सुध्दा केल्या गेली अखेर ते थकले.परंतू संबंधित अधिकारी याप्रकरणी आवर्जून लक्ष देत लेखी आश्वासनाची लाखोली वाहून न देता त्यांनी मोबदला मिळवून द्यावा अशी
शेतकरी कुटुंबाची मागणी आहे. जेव्हा पर्यंत आम्हाला जमीनीचा योग्य मोबदला मिळणार नाही तेव्हा पर्यंत आम्ही उघड्यावर असेच बसून राहणार असे अल्पभूधारक गरीब शेतकरी सुरेश ठाकरे यांनी सांगितले.