Monday, June 27, 2022
Homeवर्धाजन्मदीना निमित्त ऑक्सिजन कॅन्सनट्रेटर मशीन दान

जन्मदीना निमित्त ऑक्सिजन कॅन्सनट्रेटर मशीन दान

तालुका प्रतिनिधी
विकी (योगेंद्र) वाघमारे
हिंगणघाट

हिंगणघाट रोटरी क्लब हिंगणघाट चे सदस्य प्रवीण फटिंग यांच्या जन्मदिवसा निमित्त त्यांच्या परिवारातर्फे ऑक्सिजन काँन्सनट्रेटर मशीन डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितिला दान दिली. या निमित्त आयोजित समारोहात त्यांच्या परिवारातील त्यांच्या पत्नी सोनाली फटींग, आई श्रीमती अलका फटींग, विपीन फटिंग,प्रतिभा दाभेकर व अन्य परिवारातील सदस्य उपस्थित होते. फटिंग यांनी सांगितले की रोटरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अशोक मुखी व पूर्व अध्यक्ष रोटेरियन रितेश बुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेतून फटिंग परिवाराने आज हे उत्तम कार्य केले आहे.
ऑक्सिजन काँन्सनट्रेटर मशीन कोविड ग्रस्त रुग्णांसाठी के हॉस्पिटलमधून सुट्टी होऊन घरी आलेल्यां करिता त्यांच्या घरी त्यांना लागणाऱ्या ऑक्सीजनची पूर्तता करण्यासाठी उपयोगात येते. 5 ते 9 लीटर तक ऑक्सीजन निर्माण करण्याची क्षमता या मशीनमध्ये आहे. ही मशीन निःशुल्क स्वरूपात व कोणत्याही प्रकारची सुरक्षा राशी जमा न करता रुग्णाच्या परिवारास दिली जाईल. सध्या हिंगणघाटमध्ये १३ ऑक्सिजन काँन्सनट्रेटर मशीन निःशुल्क स्वरूपात कार्यरत आहेत. कार्य पूर्ण झाल्यानंतर रुग्णाच्या परिवाराकडून ही मशीन परत केल्या जाईल जेणेकरून इतर गरजूंना उपलब्ध होईल.
रुग्ण ठीक झाल्यानंतर त्यांच्या परिवाराकडून ही मशीन डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितिचे सदस्य तथा रोटरी के पूर्व अध्यक्ष सी. ए. अतुल हुरकट यांना सुपूर्त केल्या जाईल. या कार्याला नियमित स्वरुपात व निःशुल्क तऱ्हेने संचालित करण्याची जबाबदारी रा. स्व. संघ हिंगणघाट नगरचे सेवा प्रमुख किशन नेभनानी व हिंगणघाट नगर कार्यवाह हर्षल बुलदेव यांनी घेतली आहे.
हे कार्य वर्धा जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांच्या मार्गदर्शनात कार्यान्वित झालेले असून,डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितिने या व्यतिरिक्त कोविड रुग्णांकरिता विदर्भात कुठल्याही रुग्णालयात भर्ती होण्यासाठी मात्र ५० रुपयांमध्ये रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली आहे. डॉ. हेडगेवार सेवा समिति द्वारे आवाहन करण्यात आले आहे की, फटिंग परिवार सारखे शहरातील अन्य सक्षम दानदात्यानी ऑक्सीजन काँन्सनट्रेटर मशीन भेट द्यावी. जेणेकरून इतर गरजूंना याची सुविधा निःशुल्क रूपात उपलब्ध करून देता येईल.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular