Saturday, June 25, 2022
Homeवर्धाचिमण्यांबाबत व्हिडिओ मधून जनजागृती

चिमण्यांबाबत व्हिडिओ मधून जनजागृती

जागतिक चिमणी दिनानिमित्त पीपल फॉर यॅनिमल्सचा उपक्रम
सेवाग्राम : २० मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो.माणसांच्या अवतीभवती वावरणारी आणि बालमणावर प्रेम करणारी चिमणी आधुनिक काळात हरविली आहे.पर्यावरणाच्या दृष्टीने तीचे महत्त्व तज्ञांनी जाणले व माणले असून चीमणी वाचवा ही काळाची गरज झाली.याच उद्देशाने वर्धेच्या पिपरी येथील पीपल फॉर यॉनिमल्स यांनी चिमणीवर एक व्हिडीओ तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारीत करून तीला वाचविण्याचा संदेश आणि तिचा व दाना पाणी चा फोटो स्पर्धा पण जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेली होती.

उन्हाळ्यात चिमण्या दाना नी पाण्या अभावी मोठ्या प्रमाणावर मृत्यू पावतात त्यामुळे लोकांनी व्यवस्था करण्याचे आवाहन ही करण्यात आले आहे.यात महाराष्ट्रातील तसेच मध्यप्रदेश,उड्डूचेरी असे २५ स्पर्धक सहभागी झाले होते.
देशाची लोकसंख्या वाढत आहे ‌आधुनिक काळात अनेक बदल झाले.यात कृषी पासून तर माहिती तंत्रज्ञानापर्यंत.इवलीशी चिमणी तिचे महत्त्व काय?सकाळला जाग आणणारी,घरात, अंगणात चिवचिव करणारी.आई आजी धान्य निवडताना मधमधात करून अळ्या,किडे व धान्य खाणारी‌.घरातच किंवा वळणीखाली घरटं बणवून अंडी घालून पिल्लं देणारी.
लोकसंख्या वाढली.आधुनिक सिमेंटचे जंगल निर्माण झाले.कृषीतील पिकांच्या नुकसानित वाढ झाली.मोबाईल टॉवरची संख्या वाढली या कारणांमुळे चिमण्यांची संख्या लक्षणीय कमी झाली.
पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आणि शेतकऱ्यांचा मित्र चिमणी असल्याने शेतातील पिकांचे रक्षण फक्त चिमणी करू शकते यामुळेच चिमणी वाचलीच पाहिजे असे जगातील तज्ञांचे मत झाले
पीपल फॉर याॅनिमल्स यांनी पोस्टर तयार करून एक व्हिडीओ तयार केला‌.यात चिमणीला वाचवाच असा संदेश देऊन जे यासाठी प्रयत्न करीत आहे त्यांना धन्यवाद दिला आहे.
याला आवाज नयी तालिम समितीचे मंत्री प्रा.प्रदीप दासगुप्ता यांनी दिला.कल्पना आयुषी चव्हाण हिची असून यासाठी सहकार्य पीपल फॉर यॉनिमल्स चे आशिष गोस्वामी,कोस्तुभ गावंडे,सुमीत जैन,रोहित कंगाले,ॠषिकेश गोडसे,अभिषेक गुजर यासह कुणाल देवतारे ने सहकार्य केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular