Monday, June 27, 2022
Homeवर्धागिरड ग्रामपंचायत वर भाजप चा झेंडा

गिरड ग्रामपंचायत वर भाजप चा झेंडा

इरफान शेख
गिरड प्रतिनिधी

गिरड: स्थानिक ग्रा.प. निवडणुकीचा आज दिनांक १८/०१/२०२१ रोजी सोमवार ला निकाल लागला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजप गटाने बाजी मारली. १५ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायत मध्ये भाजप गटाने ८ जागांवर विजय प्राप्त केला तसेच कांग्रेस मनसे युति ने ५ जागेवर विजय प्राप्त केला तर सेना १, राष्ट्र वादी प्रहार युति ने १ जागेवर विजय प्राप्त केला.


भाजप गटातून विजय झालेले उमेदवार शेख इस्राइल, राजेश नौकरकर, आशीष डडमल, विजया राजेश तेलरान्धे, हेमलता गजानन वैद्य, नीलिमा राजू खड़के, करुणा विजय मेन्ढे, संगीता हरिभाऊ जुगनाके आहेत. तर कांग्रेस मनसे युति चे अमोल वसंतराव पर्बत, मंगेश दिनकर गिरडे, शालू अंबाडरे, ईन्दूबाई कापसे, भोला बावने. निवडून आले. शिव सेने चे प्रीती पोयाम आणि
राष्ट्रवादी कांग्रेस आणि प्रहार युति चे राहूल गाडवे यांनी ग्रा.प. वर वर्णी लावली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular