सिंदी (रेल्वे): येथील मित्र परिवार ग्रुप व गावातील समस्त नागरिक यांच्या वतीने रेल्वे स्टॉप साठी रेल मंत्री अश्विन, राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार रामदाजी तडस, जिल्हाधिकारी , ठाणेदार सिंदी रेल्वे यांना जाहीर निवेदन.

सविस्तर असे कोरोनाच्या काळापासून येणारी-जाणारी रेल्वे आतापर्यंत बंद असल्याकारणाने विद्यार्थ्यांना तसेच व्यापारी वर्गांना तसेच सामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे अशा परिस्थितीमध्ये सेलडोह ते सिंदी या रोडवर मोठे अपघात होत आहे तसेच विद्यार्थ्यांना आणि सामान्य माणसांना जाण्या-येण्यासाठी खर्च परवडत नसल्याने सामान्य माणसाचे जीवन त्रस्त होत आहे या अनुषंगाने मित्र परिवार ग्रुप तसेच समस्त गावकऱ्यांच्या सहयोगाने रेल्वे स्टॉप साठी निवेदनाच्या माध्यमातून एल्गार पुकारलेला आहे निवेदन मध्ये जाहीर केले की दहा तारखेपर्यंत रेल्वे गाड्यांचा थांबा न दिल्यास मित्र परिवार ग्रुप आणि समस्त गावकरी यांचेकडून रेल मंत्री त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात येईल. आणि या होणाऱ्या परिस्थितीला जबाबदार खासदार रामदाजी तडस हे राहतील असे निवेदन मध्ये जाहीर केले.
मित्र परिवार ग्रुप सदस्य उपस्थित होते.