वर्धा : येथील गांधीनगर प्रभाग क्र. 4 मधील, वर्धा विधानसभेचे आमदार पंकज भोयर यांच्या विशेष निधी अंतर्गत 1 कोटी 33 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्यातील काही कामे पूर्णत्वास गेले आहे. तर काही कामे अपूर्ण आहे ती अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे. अशी मागणी नगर सेवक सतीश वैद्य यांनी आमदार पंकज भोयर याना केले आहे .

अपूर्ण कामातील सीमेंट रस्त्याच्या कामाचे आदेश कंत्राटदाराला दिले आहे. मात्र ,एक वर्षाचा कालावधी होऊनही कामे सुरू केली नाही. त्यामुळे कामाची मुदत संपत आली आहे .
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अपूर्ण असलेले काही कामे पूर्ण करण्यासाठी आमदार पंकज भोयर यांना याबाबत गांधीनगर परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन दिले.
यावेळी आमदार पंकज भोयर यांनी लगेच अपूर्ण असलेले कामे सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांना निर्देश देवुन ताबडतोब पूर्ण करण्याबाबत सुचना केल्या आहे.