Saturday, June 25, 2022
Homeवर्धागांजा विक्रेत्याला अटक

गांजा विक्रेत्याला अटक

हिंगणघाट :
शहरात आता अंमली पदार्थाचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत असून या अंमली पदार्थाचा छुपा व्यापार करणाऱ्या विक्रेत्यांवर हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने धाड़ घालून तब्बल ४.७३० किलोग्रॅम गांजा हस्तगत करीत आरोपीला अटक केली.


गांजा ७० हजार ९५० रूपये किंमतीचा असून या प्रकरणी स्थानिक महात्मा फुले वार्ड येथील आरोपी विजय उर्फ बावा माणिक कोथरे(४०) याला काल अटक केली असून मुख्य आरोपी फरार असून पोलिस शोध घेत आहे

  आरोपीचे निवासस्थानी एका प्लास्टीक पोत्यामध्ये ४.७३० किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला.

सदरचा गांजा हा फुले वार्ड येथील फरार आरोपी राकेश सिद्धार्थ जनबंधु याचा असल्याचे अटकेतील आरोपी बावा याने सांगितले.
या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांत दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद
करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि प्रशांत पाटणकर हे करीत आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनात प्रशांत पाटणकर, डि. बी. पथकाचे शेखर डोंगरे, निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर, विरेन्द्र कांबळे, संदिप बदकी यांनी केली आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular