Saturday, June 25, 2022
Homeवर्धागांगापुर येथील रोडची समस्या निकाली काढा :-

गांगापुर येथील रोडची समस्या निकाली काढा :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी दिले निवेदन

हिंगणघाट गट ग्रामपंचायत असलेली गांगापूर येथील नवीन वस्ती येथे सिमेंट रोटचे बांधकाम करून गांगापुर गावा मध्ये रस्ता नसल्यामुळे,लोकांना त्रास सहन करावा लागत आहे,त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आक्रमक भूमिका घेत गट ग्रामपंचायत गंगापूर येथील रोड दुरुस्ती करून रोड बनवण्यात यावा या करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले. हिंगणघाट तालुका संघटक जयंत कातकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. हिंगणघाट तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेली गांगापुर येथील नवीन वस्ती वार्ड क्र.२ मधील झाली,दुरवेवस्ता,मागील १० ते १२ वर्षांपासून ५० कुटुंब राहत असून ले आउट झाल्यापासून काही प्लॉट पडलेले आहे,रस्ते नसल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात रस्ता,चिखलाने माखलेला असतो,वस्तीत पाणी साचून राहते,त्यामुळे नागरिकांना त्रास सहन कराव लागत आहे. रस्ताची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी,अशी मागणी नागरिक करीत आहेत,वार्ड क्र.२ मध्ये पाणी साचल्याने अस्वचतेचे कळस गाठला आहे दहा ते बारा वर्षा पासून रस्ते बांधण्यात आलेले नाही,पावसाळ्यात रस्ते चिखलाने माखले असून नागरिकांच्या आरोग्यास धोका होते काही पाणी खड्डे मध्ये साचुन राहते त्यामुळे नागरिकांनाचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. रस्ताची अवस्था रस्त्यावरील शाळेचा परिसरातपासून १०० मीटर आहे याबाबत गावातील नागरिक व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी भिवापूर ग्रामपंचायत ला निवेदन देऊन याकडे तातकाळ लक्ष देत देऊन नवीन रस्ताची मागणी करीत आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे पदाधिकारी राहुल दुरतकर,सचिन महाजन,जयवंत पंधरे सुरेश येलके, रमेश कुडमते,निखिल बोबडे, विजय शेंनडे,सूरज येलके,चेतन क्षीरसागर उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular