Monday, June 27, 2022
Homeवर्धाखाजगी डॉक्टर देणार कोविड रुग्णालयात सेवा.!

खाजगी डॉक्टर देणार कोविड रुग्णालयात सेवा.!

— कोविड युद्धात जिल्हा प्रशासनाला सहकार्य


वर्धा :- जिल्ह्यात सध्या साडेतीन हजाराहून अधिक ॲक्टिव्ह कोविड बाधित रुग्ण आहेत. तर नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढल्याने यात दिवसेंदिवस मोठी भर पडत आहे. अशातच दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांसह जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड युनिटमधील रुग्णखाटा तसेच डॉक्टर अपुरे पडत आहेत. भविष्यातील गरज लक्षात घेता खासगी डॉक्टरांनीही कोविड युद्धात जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले होते. याच आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्ह्यात सध्या खासगी डॉक्टरांची वज्रमुठ बांधल्या गेली आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत खासगी डॉक्टर आता नियोजित दिवशी जिल्हा सामान्य रुग्णालयात ॲक्टिव्ह कोविड बाधितांवर उपचार करणार आहेत.
कोविड-१९ विषाणूला हरविण्यासह जिल्ह्यातील काेविड मृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक खासगी डॉक्टरांनी पुढे येत वैद्यकीय सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या याच आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील तब्बल २० हून अधिक खासगी डॉक्टर रुग्णालयात दाखल ॲक्टिव्ह कोविड बाधितांसह नवीन कोविड बाधितांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी पुढे आले आहे. काल दि 15 एप्रिल पासून डॉक्टरांनी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आता जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पुन्हा अद्ययावत होत नव्या जोमाने कोविडशी लढा देण्यासाठी सज्ज झाली आहे. खासगी डॉक्टरांच्या या निर्णयाचे जिल्ह्यातील सर्वच स्तरातून स्वागत होत असून कोविडची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांनाही वेळीच चांगली आरोग्य सेवा मिळणार आहे.
रुग्णसेवेसाठी स्वयंस्फूर्तीने नोंदविली नावे
कोविड युद्धात एक योद्धा म्हणून प्रत्येक खासगी डॉक्टराने सहभागी होत कठीण प्रसंगी रुग्णसेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी केले. त्यानंतर खासगी डॉक्टरांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत रुग्णसेवेसाठी आपली नावे आरोग्य यंत्रणेकडे नोंदविली.
या दिवशी हे डॉक्टर देणार सेवा
गुरूवार (१५ एप्रिल)डॉ. संजय मोगरे,डॉ. नहूश घाटे,डॉ. सचिन पावडे,डॉ. ए. बी. जैन
शुक्रवार (१६ एप्रिल)डॉ. विपीन राऊत,डॉ. अमीत पुजारी,डॉ. शंतनू चव्हाण,डॉ. आर. रावेकर

शनिवार (१७ एप्रिल)डॉ. राजेश सरोदे,डॉ. अमरदीप टेंभरे,डॉ. स्वप्नील तळवेकर,डॉ. ए.बी. जैन
रविवार (१८ एप्रिल)डॉ. अभिजीत खांडे,डॉ. सचिन अग्रवाल,डॉ. प्रशील जुमडे,डॉ. आर. रावेकर
सोमवार (१९ एप्रिल)डॉ. अनुज वर्मा,डॉ. अनुज जैन,डॉ. सारंग गोडे,डॉ. अरुण पावडे
मंगळवार (२० एप्रिल)डॉ. सचिन तोटे,डॉ. सागर गौरकार,डॉ. नितीन भलमे,डॉ. अरुण पावडे बुधवार (२१ एप्रिल)डॉ. हर्षल पावडे,डॉ. ए. साहू,डॉ. मोहन भाईमारे,डॉ. अरुण पावडे
गुरूवार (२२ एप्रिल)डॉ. सतीश हरणे, डॉ. संदीप मोहले,डॉ. सोनू लोहियाडॉ. अरुण पावडे शुक्रवार (२३ एप्रिल)डॉ. विक्रांत वनमाली,डॉ. शैलेश नागपूरे,डॉ. विलास ढगे,डॉ. ए. बी. जैन
शनिवार (२४ एप्रिल)डॉ. आर. रावेकर,डॉ. राजेंद्र डागा,डॉ. पी. परतीकी,डॉ. भूषण पाटील
डॉ सचिन तडस: जिल्हा शल्य चिकित्सक
जिल्हा सामान्य रुग्णालयात पदव्युत्तर डॉक्टर आणि तज्ञ डाक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे कोविड रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा मिळण्यासाठी तज्ञ डाक्टरांची आवश्यकता असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आय एम ए ची बैठक घेऊन खाजगी डॉक्टरांनी कोविड रुग्णालयात सेवा देण्याचे आवाहन केले होते. याला वर्धेतील डॉक्टरांनी उत्तम प्रतिसाद दिला असून अशा कठीण परिस्थितीत डॉक्टरांनी दिलेल्या सेवेमुळे रुग्णांना उत्तम सेवा मिळतील. हिंगणघाटमधील सुद्धा खाजगी डाक्टर सेवा देण्यास तयार झाले आहेत.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular