Monday, June 27, 2022
Homeवर्धाकोविड रुग्णाच्या मदतीसाठी डॉ हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती हिंगणघाटच्या वतीने कोविड सहायता...

कोविड रुग्णाच्या मदतीसाठी डॉ हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती हिंगणघाटच्या वतीने कोविड सहायता अँपचे लोकार्पण

तालुका प्रतिनिधी
योगेंद्र वाघमारे
हिंगणघाट

हिंगणघाट परिसर व ग्रामीण जनतेच्या मदतीसाठी डॉ.हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूर,शाखा हिंगणघाटच्या वतीने कोविड सहायता सेतूचे लोकार्पण आज दि.२४ मे ला रा.स्व.संघाचे जेष्ठ सवयंसेवक प्रमोदजी हंबर्डे यांच्या हस्ते आज सकाळी एका साध्या कार्यक्रमात करण्यात आले.यावेळी जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत,डॉ हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे चंद्रपूर,हिंगणघाट शाखेचे विश्वस्त अतुल हुरकट उपस्थित होते.


हिंगणघाट कोविड सहायता सेतु निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशाबाबत माहिती देतांना हुरकट यांनी सांगितले की,ह्या सहायता सेतु अंतर्गत गावातील सरपंच आणि आशा वर्कर कडून कोविड रुग्णाच्या आरोग्या संबंधित माहिती गोळा करण्यात येईल.सहायता सेतूच्या वतीने खालील प्रमाणे सेवा देण्याचा मानस आहे.यात प्रामुख्याने ज्या रुग्णांना गरज असेल त्यांच्यासाठी
प्रशासनाची 108 क्रमांकाची रुग्णवाहिका किंवा डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीची रुग्णवाहिका उपलब्ध असल्यास रुग्णांसाठी मिळवून देण्यात येईल व हिंगणघाट- सावंगी(मेघे) सेवाग्राम रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांसाठी खाटा उपलब्ध असल्याबाबत माहिती देण्यात येईल.
हिंगणघाट व ग्रामीण रुग्णालयातील अन्टीजेन आणि आरटीपीसीआर चाचणी केलेल्या रूग्णाला योग्य ती माहिती देण्यात येईल.कोविड लसीकरण
बद्दल माहिती देऊन सर्व गावकऱ्या मध्ये जागृती निर्माण करणे,कोविडच्या अति जोखीम असलेल्या रुग्णांना (शुगर ,बीपी , हृदयरोग असलेल्या) ताबडतोब उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल.
रुग्णालयातून बरे झालेल्या रूग्णांना गरज असल्यास विनाशुल्क ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर डॉ.हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे वतीने रुग्णाच्या घरी मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस डॉ हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीच्या हिंगणघाट शाखेच्या वतीने करण्यात आलेला आहे.
या लोकाभिमुख अभियानात जागृती उदासी,हर्षा उदासी,दिशा मोटवानी, रिया मिहानी,सुमित जेसवानी या तरुणी आपले योगदान देत आहेत.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular