Tuesday, June 28, 2022
Homeवर्धाकोरोना आपत्तीकाळात रासेयो स्वयंसेविका पल्लवी राउतने केले दोनशे मास्कचे मोफत वाटप

कोरोना आपत्तीकाळात रासेयो स्वयंसेविका पल्लवी राउतने केले दोनशे मास्कचे मोफत वाटप

0 रासेयोच्या शिबीर संस्कारातून मिळाली प्रेरणा
0 सामाजिक कृतज्ञतेतून गाव परिसरात पावणे दोनशे मास्क चे मोफत वाटप

सेलू : मागील दीड वर्षापासून आपण सर्व कोरोनाच्या आपत्ती काळातून जात आहोत . यात सुरक्षित अंतर आणि मास्कचा नियमित वापर सर्वांची निकड झालेली आहे . ही बाब लक्षात घेऊन स्थानिक यशवंत महाविद्यालयाची विद्यार्थिनी पल्लवी राउत हिने याकाळात स्वनिर्मित सुमारे पावणे दोनशे मास्कचे आपल्या घोराड गाव -परिसरातील गरजूंना मोफत वाटप करून सामाजिक कृतज्ञता दाखवून दिली आहे .


यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनाची पल्लवी ही बी. ए. भाग 1 व 2 मध्ये कृतीशील स्वयंसेविका राहिलेली आहे . ती आता अंतिम वर्षाला शिकत असून आपल्या गावात झालेल्या दोन विशेष शिबिरातून आपल्याला ही प्रेरणा मिळाल्याचे ती सांगते . अडीच एकर कोरडवाहू शेती असणाऱ्या पल्लवीचे आई वडील शेती करतात . पल्लवी अत्यंत होतकरू असून शिलाई कामातून आपला शिक्षण खर्च करते . गृह अर्थशास्त्राची विद्यार्थिनी असल्याने शिलाई कामातील उरलेल्या कापडातून पल्लवीने तिच्या कडे ड्रेस शिवायला आलेल्या गरजूंना मास्क मोफत देऊन त्याविषयी प्रबोधनही करीत गेली . असे करत करत तीने गेल्या दीड वर्षात आपल्या परिसरात अनेकांना असे मास्क वाटप केले आहे .

प्रतिक्रिया

  यशवंत महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्य डॉ. अर्चना फाळके डहाने , रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ . राजेंद्र मुंढे आणि डॉ . अनंत रिंढे यांचे यांचे प्रोत्साहन व उचित मार्गदर्शन यामुळे मी हे करू शकले . सोबतच  आई वडीलांचे आशीर्वाद आणि बहिणीची साथ तसेच मैत्रिणींचा उत्साह मला मोलाचा ठरला .
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

1 COMMENT

Most Popular