Saturday, June 25, 2022
Homeवर्धाकोरोनाच्या पाश्र्वभूमीवर रामजन्म उत्सवा संबंधी पोलिस ठाण्यात बैठक

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर रामजन्म उत्सवा संबंधी पोलिस ठाण्यात बैठक

समुद्रपुर:


तालुक्यातील गिरड येथील पुरातन श्रीराम मंदिरात कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर रामजन्म उत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्या संबंधी पोलिस ठाण्यात बैठक घेण्यात आली.यावेळी येथिल सामाजिक कार्यकर्ते दाबणे गुरुजी यांच्याकडून गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनिल दहिभाते यांना ग्रामगीता भेट ,कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर आलेल्या रामनवमी उत्सव निमित्त पोलिस ठाण्यात श्रीराम मंदिर कमेटीची बैठक ठाणेदार सुनिल दहिभाते यांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती.यावेळी कोरोना महामारीचे संकट लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्व धार्मिक सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.याच पाश्र्वभूमीवर गिरड येथे गेल्या शेकडो वर्षांपासून साजरा करण्यात येणारा राम जन्म उत्सव व घोडा यात्रेवर कोरोनाच्या साजरा करता येणार नसल्याचे या संबंधी पोलिस प्रशासनाकडून तश्या सुचना श्रीराम मंदिर कमेटीला देण्यात आल्या आहे.तसेच राम नवमीच्या दिवशी फक्त पुजाऱ्याच्या हस्ते पुजा अर्चना करून हा उत्सव अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना यावेळी ठाणेदार सुनिल दहिभाते यांनी दिली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते तसेच श्रीराम मंदिर कमेटीचे सचिव बबनराव दाबणे गुरुजी यांनी ठाणेदार सुनिल दहिभाते यांना ग्रामगीता भेट दिली.या बैठकीला सरपंच राजु नौकरकर, उपसरपंच मंगेश गिरडे,पोलिस उपनिरीक्षक दिपक निंबाळकर, श्रीराम देवस्थान कमेटीचे अध्यक्ष बलवंत गाठे,उपाध्यक्ष वसंतराव पर्बत, सदस्य सुरेश गिरडे,माजी सरपंच दिपक पंढरे, विष्णू घरत, राकेश बोबडे,
पोलिस कर्मचारी महैद्र गिरी आदींसह श्रीराम मंदिर कमेटीचे सदस्य उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular