Saturday, June 25, 2022
Homeवर्धाकोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता मनसे ची संपूर्ण हिंगणघाट शहरात सनिटायझर फवारणी मोहीम

कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता मनसे ची संपूर्ण हिंगणघाट शहरात सनिटायझर फवारणी मोहीम

शहरात शासकीय निमशासकीय कार्यालये,दवाखाने, पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय धार्मिक स्थळे व शहरातील संपूर्ण वार्डात घरो-घरी सनिटायझर फवारणी मोहीम

तालुका प्रतिनिधी
योगेंद्र वाघमारे
हिंगणघाट

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना रुग्ण संख्येतही वाढ होत आहे त्यामुळे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हिंगणघाट शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता ठीक-ठिकाणी निर्जतुकिकरण करण्याकरिता मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात निःशुल्क सॅनिटायझर फवारणी सेवा १९ मे पासून संपूर्ण हिंगणघाट शहरात सुरू करण्यात आली असून शहरातील संपूर्ण रस्ते, गल्ल्या, वॉर्डां-वॉर्डांतील प्रत्येक घरे,शासकीय निमशासकीय कार्यालये, दवाखाने, लसीकरण केंद्र, विलगीकरण केंद्र, आठवडी बाजार, दुकान लाईन, हॉटेल लाईन, व्यावसायिक भागात, उपजिल्हा रुग्णालय, तहसील कार्यालय ,पोलीस स्टेशन ,धार्मिक स्थळे, तसेच कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांचा घरी निर्जंतुकीकरण करण्यात आले तेव्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आवश्यक असल्यास मास्क लावून व सनिटायझर सोबत घेऊनच घराबाहेर पडावे असे आवाहान मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले शहरातील जनतेला करत आहे.


मोहिमेत मनसे उपजिल्हाध्यक्ष अमोल बोरकर,जिल्हासचिव सुनील भुते, वा.सेना जिल्हाध्यक्ष रमेश घंगारे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष राहुल सोरटे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष किशोर चांभारे, सुधाकर वाढई, आरोग्य सेवा जिल्हाध्यक्ष उमेश नेवारे, बचू कलोडे शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष जगदीश वांदिले, कामगार सेना जिल्हाध्यक्ष अजय पर्बत, नरेश चीरकुटे, राजू सिन्हा, किशोर भजभूजे, प्रशांत ऐकोनकर, शेखर ठाकरे, अमोल मुडे, नितीन भुते राहुल जाधव,मिथुन चव्हाण, इत्यादी पदाधिकारी व मनसैनिक कांनी शहरातील वॉर्डात- वॉर्डात जाऊन फवारणी करून घेतली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular