Monday, June 27, 2022
Homeवर्धाकोरोणामुळे आयुर्वेदिक औषधांना डिमांड

कोरोणामुळे आयुर्वेदिक औषधांना डिमांड


पारंपारिक आयुर्वेदिक जडीबुटीचा वापर वाढला
समुद्रपूर
प्रतीकारकशक्ती वाढवण्यासाठी व शरीर स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी कोरोणाच्या संकटकाळात नागरिकांची पसंती जडीबुटी आयुर्वेदिक औषधांना मिळत आहे.काही जण घरीच विविध प्रकारच्या औषधीयुक्त साहित्यापासून काढे व चूर्ण तयार करीत आहेत.

आयुर्वेदिक काढा घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कोरोना काळात कामानिमित्त घराबाहेर पडणारे अनेक जण नियमित काढा घेत आहेत. काड्याला आयुर्वेदात फार महत्त्व आहे.पूर्वी काळी मुख्यत्वे आयुर्वेदाचा वापर केला जात असे.
आधुनिक काळात या आयुर्वेदिक औषधी व जडीबुटीकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते.मात्र सध्या कोरोणाच्या धास्तीने पुन्हा एकदा आयुर्वेदिक काढयाला पसंती वाढली आहे. त्यामुळे काढयालासाठी लागणारी दालचिनी ‘लवंग’काळीमिरी’हिरवी इलायची, ‘जायफळ’हळद’जायपत्री’ सुंठ’अद्रक आदी मसाल्यांच्या पदार्थांची मागणी वाढली आहे. काड्याच्या साहित्याचा खप पन्नास टक्क्यांनी वाढला आहे.विक्री वाढल्यामुळे बऱ्याच ठिकाणच्या जडीबुटी व पारंपारिक आयुर्वेदिक औषधांच्या दुकानावर नागरिकांची गर्दी दिसत आहे.कोरोणाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढताच जडीबुटी ला मोठी मागणी वाढली आहे. खोकल्यासाठी हिरड,कलमी,मिरी, ज्येष्ठमद्य,वेखंड,मध,पिंपळी,गुळवेल, लवंग,आदी टाकाऊ घरोघरी काढा घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
प्रतिक्रीया
कोरोना संसर्गामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णांची संख्या मोठा चिंतेचा विषय आहे. पूर्वापार चालत आलेली आयुर्वेदाची परंपरा या काळात मोठी उपयोगी. येत आहे.आपल्या सभोवताल भरपूर वनस्पती आहेत.त्या प्रत्येक वनस्पतीत औषधी युक्त गुण आहेत, पण जे जाणकार शिवाय कुणालाही माहीत नाही.यातील जाणते मंडळी बहुधा वयोवृद्ध आहेत.नविन पिढीला केवळ ऍलोपॅथिक औषध वर विश्वास आहे.मात्र यामधील बऱ्याच औषधी आयुर्वेद मिळालेले आहे.आयुर्वेद ऋषी मुनीपासून चालत आलेली चीकित्सा आहे.यामध्ये आजार दुरुस्त करण्याचे मोठेगुण आहेत. कोराना काळात त्याला अटकाव करण्यासाठी दवाखान्याच्या औषधीपेक्षा पारंपारिक आयुर्वेदिक औषधीवर ग्रामीण भागात भर दिला जात आहे.
जयश्री श्रीराम गोहने आयुर्वेदाचार्य

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular