Saturday, June 25, 2022
Homeवर्धाकृषीभागा मार्फत होत असलेल्या कामाची कृषी उपसंचालकाकडून पाहणी.!

कृषीभागा मार्फत होत असलेल्या कामाची कृषी उपसंचालकाकडून पाहणी.!देवळी : तालुक्यातील इसापुर येथे अशोक भानखेले , कृषी उपसंचालक व कदम गुण नियंत्रण अधिकारी यांनी कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत सुरू असलेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन कृषी विभागामार्फत होत असलेल्या कामाची पाहणी केली. विकेल ते पिकेल योजने अंतर्गत मधुकर ठंठारेयांची पपई लागवड व विक्रीचे स्टॉल व पंकज कापसे यांनी प्लास्टिक मलचिंग वर विविध भाजीपाला लागवडीला भेट देऊन उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती करण्याचे आव्हान केले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा अनिल इंगळे, कृषी उपसंचालक संजय हाडके, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी परमेश्वर घायतिडक, मंडळ कृषी अधिकारी देवळी अतुल वायसे, कृषी पर्यवेक्षक अनिल सांगळे व श्रीकांत गुट्टे, कृषी सहायक उर्मिला जाधव व प्रगतशील शेतकरी पंकज कापसे, इरफान अली,गौरव धोटे व इतर उपस्थिती होते. प्रक्षेत्रावरील भेट सुरू असतानाच भानखेले यांना नियोजन पाहणी दौरा सोडून आयुक्त ( कृषी) यांचे आदेशानुसार तातडीचे सभेसाठी वर्धा येथे रवाना व्हावे लागले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular