देवळी : संत गाडगेबाबा हे गोरगरीब, दिन-दलीत यांच्यामधील अज्ञान ,अंधश्रद्धा,अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे, देव दगडात नसून त़ो माणसात आहे, हे तत्वज्ञान
सहजपणे सर्वसामान्य लोकांना पटवून देणारे समाजसुधारक होते, असे प्रतिपादन मुख्याध्यापिका उर्मिला मसराम यांनी केले.

त्या यशवंत विद्यालय आगरगावच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानावरून बोलत होत्या.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक मनोज सुटे,अभय कुंभारे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रबोधन करतांना मुख्याध्यापिका उर्मिला मसराम म्हणाल्या की,आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांना विविध प्रश्न विचारुन त्यांना त्यांच्या अज्ञानाची,दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत.त्यांचे उपदेशही साधे-सोपे असत.चोरी करू नका.सावकाराकडून कर्ज काढू नका.व्यसनाच्या आहारी जावू नका.देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका.जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका.असे ते आपल्या कीर्तनात सांगत’.असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे संचालन शशिकांत सानप यांनी तर आभार कु.संध्या ठाकूर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ज्येष्ठ शिक्षक मनोज सुटे,रमेश ठाकरे,अभय कुंभारे,कु. संध्या ठाकूर व शिक्षकेत्तर कर्मचारी दिनेश नेहारे आंदींनी सहकार्य केले.