अंतोरा ;
गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारी मुळे पूर्ण जगग्रस्त आहे. याचा सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. पहिली लाट ओसरली, दुसरी लाट आली, आणि दुर्दैवाने तीसरी लाट येण्याचे संकेत आहे. या लाटेने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. कोरोणा ची आजची स्थिती पाहता लॉकडाऊन केव्हा संपेल याची कल्पना नाही. अशातच कारंजा तालुक्यातील युवक व युवतींनी एकत्र येत स्वखर्चातुन व देणगी दात्यांच्या सहाय्याने अत्यंत गरजु, निराधार, अनाथ आणि वृद्ध अशा ३०० कुटुंबांना किराणा किट वाटप करण्याचा संकल्प केला आहे.

कारंजा नगरीचे ग्रामदैवत संत लटारे महाराज जन्मोत्सवच्या निमित्ताने त्यांनी आतापर्यंत १०० किटचे वाटप केले असून त्यात अत्यंत गरजु, निराधार व वृद्ध दांपत्य यांचा समावेश आहे. लवकरच ते पुढील संकल्प पुर्ण करणार असल्याची माहिती युवकांनी दिली आहे.