इंटक महासचिव आफताब खान यांचा इशारा
हिंगणघाट :
मोहता इंडस्ट्रीजने २२ मे पासून गिरणीला ताळेबंदी करण्याची नोटीस लावल्याने कामगार वर्गात तीव्र असंतोष निर्माण झालेला असून मोहता व्यवस्थापनाच्या या अन्यायकारक वागणुकीला कायदेशीर मार्गाने लढा माजी खासदार व इंटकचे अध्यक्ष नरेश पुगलिया याच्या नेतृत्वात कामगारांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास इंटकचे महसचिव आफताब खान यांनी व्यक्त केला.

मोहता इंडस्ट्रीजने टाळेबंदी करण्याच्या निर्णया विरूद्ध औद्योगिक न्यायालय नागपूर येथे इंटकने याचिका दाखल केली असून कोविडच्या काळात न्यायालय बंद असतांना याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली यावर.१ जूनला सुनावणी होणार आहे.
येथील कामगारांच्या अनेक पिढ्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केले आणि त्याचा फायदा घेत मोहता परिवाराने एकाच्या चार गिरण्या निर्माण केल्या मात्र स्वतःच्या फायद्यासाठी या गिरणी व्यवस्थापकांनी इंटक,कामगार,न्यायालय,सरकारी यंत्रणा या सर्वांना फसवून टाळेबंदी करण्याचा घेतलेला निर्णय हा शहरातील प्रत्येक श्रमजीवी मजुरांच्या घामाचा आणि गिरणीच्या प्रगतीसाठी त्यांनी आटविलेल्या रक्ताचा हा अपमान आहे. मात्र या गिरणीच्या एकही कामगारांची रोजीरोटी बुडू देणार नाही त्यासाठी शेवटल्या क्षणापर्यंत लढा देण्यात येईल असा इशारा इंटकचे महासचिव आफताब खान यांनी दिलेला आहे.