कारंजा –

तालुक्यातील काजळी येथे गावातील मध्यभागी असलेल्या चौकात घाणीचे साम्राज्य होते, या चौकाच्या परिसरात नागरिक कचरा टाकत असल्याचे त्यामुळे येथे आरोग्य धोक्यात आले असता या चौकात गावातील दररोज विसावा घेणारे वृद्धांनी तो परिसर स्वच्छ करण्याचे ठरविले त्यानंतर वृद्धांनी हा परिसर स्वच्छ करून त्या ठिकाणी मुरूम टाकण्यात आला. त्या ठिकाणी बालकाच्या हाताने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दत्तू बोरजे, विनोद मुखे, सुनील देशमुख, प्रेम अड्डे, बंडू कोहळे,अविनाश मुखे, संजय मुखे, मंगेश देशमुख, कृष्णा नेहारे, करण कोहळे, कांचन खवशी, धोंडबा डोंगरे, शंकर ढोले, रजत खवशी, पोलीस पाटील ,प्रहार शाखा प्रमुख रोशन वरठी उपस्थित होते.