Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरकठीन प्रसंगी दिला पीडीत कुटुंबाला मदतीचा हात

कठीन प्रसंगी दिला पीडीत कुटुंबाला मदतीचा हात

भोई समाज मदत केंद्रचा सेवा उपक्रम

सिंदी (रेल्वे) : सिंदी येथील श्री दाते आणि हिंगणघाट तालुक्यातील कात्री येथील रहिवासी रामुजी बापूराव नान्ने यांचा नुकताच सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. या परिवारावर आलेले संकट आपती सावरण्यासाठी महाराष्ट्र मदत केंद्र ग्रुप च्या माध्यमातून महाराष्ट्रातील भोई समाजाने आर्थिक मदतीसाठी सर्वांनी पुढाकार घेऊन अती हलाखीची परिस्थिती असलेल्या नान्ने परिवाराला शुक्रवारी (ता. ८) मदत म्हणुन सामुदायिक गोळा झालेले निधी ११ हजार ६०० रुपयेचा धनादेश देऊन कुटुंबाचं सात्वन केले.

या परिवारातील सदस्याची चर्चा करून हिमत देण्याचं काम भोई समाज क्रांती दलाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केले.
सिंदी येथील दाते व कात्री गावातील नान्ने परिवाला अशा प्रसंगी ठोस आर्थिक मदत करुन जे सामाजिक दायित्वाची सुरवात भोई समाजाने केली त्याबद्दल त्यांच्या कार्याचा सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यासाठी पुढाकार घेणारे भोई समाज क्रांती दलचे जिल्हाध्यक्ष राकेश मोहिजे,जिल्हा सचिव पंकज बावणे, तालुका उपाध्यक्ष कृष्णा मेश्रे,हिंगणघाट तालुका संघटक मनोज करलुके, कात्री शाखा प्रमुख चिंतामण मांढरे ,शंकर दायरे आदी सर्व पदाधिकारी आणि समाज बांधवानी मौलाचे सहकार्य केले. शिवाय मद्दतीची चांगली साखळी यापुढेही सुरु ठेवण्यासाठी समाज बांधवानी भरभरुन आर्थिक मदतीचा हात देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular