Sunday, May 29, 2022
Homeवर्धाओबीसींच्या स्वतंत्र वसतिगृहासाठी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाने समाज कल्याण आयुक्ताला घातला...

ओबीसींच्या स्वतंत्र वसतिगृहासाठी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाने समाज कल्याण आयुक्ताला घातला घेराव
हिंगणघाट :

राष्ट्रीय ओबीसी विध्यार्थी महासंघ व युवा महासंघ वर्धा जिल्हाध्यक्ष रोहित हरणे यांचे नेतुत्वात समाज कल्याण आयुक्त यांना ओबीसी वसतिगृह व शिष्यवृत्ती साठी घेराव टाकण्यात आला. अनेक वेळा निवेदन , आंदोलन करून सुद्धा मागणी कडे सरकार दोन वर्षे उलटायला आले तरी ओबीसी विद्यार्थ्यांच्या मागण्यापुर्तीकडे दुर्लक्षित करीत आहे,विद्यार्थ्यांना वस्तीगृह व शिष्यवृत्ती तसेच आधी विविध मागण्या करिता राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ व युवा महासंघाच्या वतीने समाज कल्याण कार्यालय धडक देण्यात येऊन नारे निदर्शने करण्यात आले समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री कुलकर्णी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.


मागील सरकारने परिपत्रका नुसार ३६ वसतिगृहसाठी परिपत्रक काढले परंतु माञ प्रत्येक्षात सुरू करण्यात आले नाही, महाविकास आघाडीचे ओबीसी मंत्री महोदय प्रत्येक ओबीसी मेळाव्यात ७२ वसतिगृह सुरू करणार अश्या घोषणा सरकार आल्या पासून करीत आहेत परंतु प्रत्येक्षात कोणतेही परिपत्रक काढत नाही आहेत.
वसतिगृह सुद्धा सुरू करत नाही आहे, निवेदनातील मागणीनुसार ओबीसी विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्रा वस्तीगृह देण्यात यावा.वसतिगृह शहरातील तीन किलोमीटर परिसरात असावे याकरिता राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ व युवा महासंघ द्वारे पंधरा दिवसाचा अल्टिमेटम आयुक्ताला देण्यात आलं व मोठ्या आंदोलनाचा इशारा राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ द्वारे देण्यात आला.

यावेळी सुधीर पांगुळ,राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रोहित हरणे, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अक्षय इंगोले, जिल्हा समन्वयक दिनेश काटकर, हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष शैलेश मैंद, युवराज माऊसकर, निनाद जगताप, विशाल आसुटकर,अनिकेत कोटांबकर, अनिकेत दाते,गौरव गोहाडे,अभिजित साबळे,योगेश निखार, रितू मोघे,विवेक किटे,आयुष ढोमने,आशिष धोटे, गौरव भोयर, सौरभ हीवसे, पीयूष ठाकरे, आशिष धोटे, निखिल कन्नाके, अभी चांदुरकर, रोशन डोळे, अथर्व भोयर आदी सर्व सदस्य उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular