आर्वी : स्थानिक नगर परिषद गांधी विद्यालयातील एनसीसी छात्र सैनिक कोरोना काळामुळे शाळा जरी बंद असल्या तरीसुद्धा सर्व कोरोना नियमांचे पालन करून एनसीसी छात्र विद्यार्थांनी एक वेगळा उपक्रम राबविला.

संत गाडगे महाराज यांची जयंती निमित्त स्वच्छतेचा संदेश सर्व छात्र सैनिकांनी विविध ठिकाणी स्वच्छता राबवून कुठेही एकत्र न जमता संत गाडगे महाराजांचा विचार खरोखरच लोकांपर्यंत पोहोचविला या उपक्रमांमध्ये सर्कसपूर मधून नेहा राऊत ,श्रद्धा सहारे, पलक मात्रे, हरदोलीु गावांमधून ऋतुजा जामखुटे, आर्वी मधून कश्यप गायकवाड,वेदांत श्रीराव ,वेदांत हुशंगे , प्रणय दूधकोर यांनी गुरुनानक परिसरामध्ये स्वच्छता केली तसेच जयंत कणके , ऋग्वेद निंभोरकर ,हर्षल निनावे, यांनी तायडे ले आऊट, साई नगर मध्ये मनस्वी कांबळे, शिरपूर रोड येथे पूर्वा सोलव, प्रणाली मनोहरे, तेजल डहाके या अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.त्यांनी आपल्या परिसरामधील लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला आणि खऱ्या अर्थाने गाडगे महाराजांचे विचार आज कोरोना काळामध्ये ही शिक्षण आणि स्वच्छता या दोनच गोष्टीवर आपलेआरोग्य निर्भर असते, त्यांची जयंती ही खऱ्या अर्थाने आपल्या अंगी स्वच्छता गुण ठेवून साजरी करण्याता आली. छात्र सैनिकांना या उपक्रमाचे मार्गदर्शन एन.सी.सी अधिकारी प्रमोद नागरे यांनी केले.