Monday, June 27, 2022
Homeवर्धाएकाही प्राथमिक आरोग्य केंद्रात नाही बालरोगतज्ञ

एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रात नाही बालरोगतज्ञ

तालुक्यात उपचाराबाबत प्रश्नचिन्ह: तिसऱ्या लाटेची तयारी करणार कशी?
समुद्रपूर
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वैद्यकीय तज्ञांकडून इशारा देण्यात आला आहे. या लाटेत लहान मुलांना (१८ वयोगटापर्यंत )अधिक धोका होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.असे असले तरी लहान मुलावर प्राथमिक स्तरावर उपचार करण्यासाठी तालुक्यातील एकी प्राथमिक आरोग्य केंद्रात बालरोगतज्ञ नाही.

समुद्रपूर तालुक्यात एक ग्रामीन रुग्णालय व चार प्राथमिक आरोग्य केंद्र केंद्र असून तिथे बालरोगतज्ञांची वानवा असल्याने संभाव्य तिसऱ्या लाटेत समुद्रपूर परिषद आरोग्य विभागा लहान मुलावर उपचार कसे करणार? प्राथमिक आरोग्य केंद्राला कोणी बाल रोगतज्ञ देईल का?असे म्हणण्याची वेळ आली आहे.
समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात चार वैद्यकीय अधिकारी असून बालरोग तज्ञाचेपद हे रिकामे आहे.तेथे कार्यरत असलेले डॉक्टर वरभे हे बालरोगतज्ञ अजून वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहे तर मांडगाव,गिरड,कोरा,नंदोरी या प्राथमिक केंद्रावर बालरोगतज्ञ नसल्याने संभाव्य लाटेत मोठी अडचण येणार आहे.
कोरोणाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांसाठी सेवाग्राम,सावंगी मेघे येथे उपचार देण्याचे नियोजन आहे.मात्र तज्ञांकडून वर्तविण्यात आलेल्या तिच्या लाटेचा धोका पाहता ते पुरेसे नाही. त्यासाठी तालुकास्तरावर लहान मुलांसाठी कॉल सेंटर उघडण्यात यावे अशी मागणी समुद्रपूर तालुक्यातील जनता करीत आहे परी आणि आता खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण करण्याची आवश्यकता निर्माण झाली.
प्रतिक्रीया
शासनाने रिक्त असलेली पदे लवकरात लवकर भरावे संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी अतिरिक्त डॉक्टर भरण्याचे नियोजन करावे शासनाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र केंद्रात तात्काळ बालरोग भरावेत
समीर कुणावर आमदार हिंगणघाट विधानसभा क्षेत्र
आताच्या लाटेत मुले कोरोनाबाधित झाले आहे.ही मुले लाटेत बाधित झाली नसून पालकांच्या संपर्कातून कोरोनाबाधित होत आहे.असे असले तरी घाबरण्यासारखे काही कारण नाही.हे गंभीर नसून लवकर बरे होत आहे तरी.पुढच्या लढ्यासाठी नियोजन सुरू आहे.
कल्पना म्हैसकर वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय समुद्रपूर

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular