अखेर युवक काँग्रेस कमिटी च्या आंदोलनाला आले यश
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : शहरातील घरकुल लाभार्थ्यांना मंजूर घरकुलची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करावी करिता दि.२-८-२०२१ रोजी मा.श्री.अमरभाऊ काळे यांच्या नेतृत्वात शहर काँग्रेस कमिटी, व युवक काँग्रेस कमिटी व घरकुल लाभार्थ्यांच्या नगर परिषद आर्वी वर धडक मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाला संबोधित करतांना मा.मुख्याधिकारी साहेब न.प.आर्वी.यांनी २१६ घरकुल लाभार्थ्यांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात दुपारी ३ वाजेपर्यंत टाकण्यात येत आहे.व उर्वरित घरकुल लाभार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र किव्हा टीसी पैकी एक दस्तऐवज आल्यानंतर लगेच वेरीफाय करून ८ ते १० दिवसात बँक खात्यात पाठविले जाईल असे आश्वासन दिले.परंतु दिवसभरात पैसे बँकेत जमा न झाल्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा काँग्रेसचे कार्यकर्ते न.प.मुख्याधिकाऱ्यांना विचारणा करण्याकरिता गेले परंतु पूर्ण दिवस मा.मुख्याधिकारी आता येतो मग येतो म्हणत आले नाही त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांकडून हेतुपुरस्सर नसून अनावधानाने सामानाची तुटफुट झाली नंतर काँग्रेसच्या अंगद गिरीधर याला अटक करून रात्री उशिरापर्यंत सोडण्यात आले .


दि.४-८-२०२१ रोजी ११.वाजता युवक काँग्रेसचे कार्यकर्ते शहर काँग्रेसचे कार्यकर्ते नगर परिषद मुख्याधिकारी यांना विचारणा करणे करिता गेलेअसता पोलिसांनी सर्वांना बाहेर थांबा सांगितले नंतर मुख्याधिकारी यांनी तहसील मध्ये चर्चेकरिता बोलावले सर्व मोर्चा तहसील कडे वळला मा.मुख्याधिकारी श्री.मगर यांनी सर्वांशी चर्चा करून आज दिनांक.४-८-२०२१ रोजी २ वाजेपर्यंत लाभार्थ्यांची रक्कम बँकेत पाठवत असून माझे कडून सर्व कार्यवाही पूर्ण झालेली आहे . त्यात २१६ लाभार्थ्यांचा समावेश आहे उर्वरित लाभार्थी ज्यांना कागदपत्रे जमा कराची आहे त्यांची रक्कम पुढील आठवड्या पर्यंत बँकेत पाठविण्यात येईल हा पक्का शब्द त्यांनी मोर्चातील सर्वांसमोर दिला .
त्यामुळे सर्वांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला .त्यानंतर नगर परिषद समोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नगर परिषद आर्वी ला दे दणका आंदोलनाला विजय झाल्याच्या घोषणा दिल्या
त्यावेळी आर्वी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. पंकजभाऊ वाघमारे, अजिंक्य काळे, नगरसेवक रामू राठी, अक्षय राठोड,युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष सागर शिरपूरकर, आर्वी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल साबळे, गजानन गावंडे, छोटुभाऊ शर्मा, गुणवंत बनसोड, शेख मुजफ्फर ,शेख जमीर, देवेंद्र तळेकर, बंटी सुरवाडे, विक्की लसूनते, प्रसाद कुळधरणी,इरफान भाई, संजय डोंगरे,शुभम उईके,प्रवीण मोहेंकर, शुभम बुल्ले, इरफान रजा, सोनू महाजन,श्रीकांत गुल्हाने,अंगद गिरीधर,भूषण पोकळे, रवींद्र राठोड,गणेश नखाते, दिपक मोटवाणी, गुड्डू निचत, रितेश राणे,गजानन निंबेकर, जयश्री भीमके,विजय उईके, प्रतीक बावणे, प्रशांत खरकटे, कलाम शेख, शम्मी शेख,गौरव मोहोड,मनोज गुल्हाने नामदेव साठे व सर्व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.