Saturday, June 25, 2022
Homeवर्धाआर्वी ठाणेदारसह डीबी पथक सन्मानित

आर्वी ठाणेदारसह डीबी पथक सन्मानित

आर्वी :

कोणताही पुरावा उपलब्ध नसताना चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावून पाच चोरट्यांना अटक करून मुद्देमाल जप्त केल्याच्या प्रशासनही कामगिरीबद्दल आर्वी पोलीस ठाण्यातील ठाणेदारासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला आर्वी पोलीस ठाण्यातील एका कार्यक्रमात अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्फत उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंके यांनी गौरवपत्र, प्रशंसापत्र देऊन या कर्मचार्‍यांचे कौतुक केले यामध्ये ठाणेदार संजय गायकवाड गुन्हे अन्वेषण विभागाचे रंजीत जाधव, अनिल वैद्य, सतीश नंदागवळी, प्रदीप दाताळकर यांचा समावेश होता. गुन्ह्यात कोणताही भौतिक व तांत्रिक पुरावा नसताना त्यांचा तपास करून आरोपीकडून चोरीतील गुन्ह्यातील चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करून पाच आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल हे प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular