Saturday, June 25, 2022
Homeवर्धाआर्वीत गॅस लीकमुळे घराची राखरांघोळी

आर्वीत गॅस लीकमुळे घराची राखरांघोळी


महिला गंभीर जखमी,दहा लाखाचे नुकसान, चौके कुटुंब उघड्यावर

समुद्रपूर : तालुक्यातील गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर्वी गावात सिलेंडरच्या पाईप मधून गॅस लीक होऊन लागलेल्या आगीत घराची राखरांगोळी झाली. या आगीत एक महिला जखमी झाल्याची घटना गुरुवारी 11 मार्च रोजी सकाळी 7 वाजता घडली.


या आगीत घर पूर्णतः जळून खाक झाल्याने दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
आर्वी येथील संजय चौके यांच्या घरातील जीवनपयोगी वस्तूसह शेतातील धान्य जळून खाक झाल्याने कुटुंबं उघड्यावर आले आहे.

संजय चौके यांच्या पत्नी सकाळी गॅसवर चाय मांडायला गेली गॅस सुरु करतांना रेग्युलेटर नळीतून गँस लीक झाल्याने पेट घेतला आणि महिलेच्या अंगावरील वस्त्र पेटल्याने दुर्गा चौके गंभीर जखमी झाल्या.
त्यांना उपचार्थ गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले.


सकाळी दुर्गा चौके गॅसवर चाय मांडत असताना गॅस लीक झाल्याने आग लागली घरात त्यांच्या सासू सीताबाई चौके आणि जाऊ कलावती चौके हजर होत्या. गँस लीक होताच दुर्गा चौकेच्या अंगावरील कापड्यानी पेट घेतला. पाहता पाहता संपूर्ण घराला आगीने वेधले. शेजाऱ्याना आगीचे लोंढे दिसताच घराकडे धाव घेतली. आणि आगीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. गावात नळ योजना कार्यान्वित असून पुरेसे पाणी प्रत्येकाकडे उपलब्ध असल्याने घराघरातून पाणी आणून गावकर्यांनी आग विजविली. मात्र तोपर्यंत आगीत संपूर्ण घराची राख रांघोडी झाली.

संजय चौके अल्पभूधारक शेतकरी असल्याने जोड व्यावसाय करून कुटुंबाचा गाडा चालवीत होता.
दोन दिवसापूर्वी पन्नास हजार रुपये किमतीचे विक्रीसाठी कपडे आणले होते.जळून खाक झाले.
दुर्गा चौके गावातील बचत समुहाच्या प्रेरिका असल्याने बचत समूहाची मासिक बचत पन्नास हजार रुपये रक्कम कपाटात होती. तर संजय चौके यांनी तूर विक्रीतून मिळालेले पन्नास हजार रुपये आणि एक लाख रुपये किमतीचे दागिने, कपडे आलामारीत ठेवले होते. तर 20 किंटल कापूस, तुरी, चणा, गहू, तांदूळ, अन्य धान्य या आगीत भस्मसात झाले.
रोजच्या वापरातील कपडे, भांडे संपूर्णता घरातील लाकडी, लोखंडी साहित्य जळून कोळसा झाल्याने त्यांचे दहा लाखाचे नुकसान झाले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular