आर्वी : नुकताच नगर परिषद आर्वी द्वारा स्वछ सर्वेक्षण 2021 अंतर्गत नेहमीच स्वच्छतेला प्राधान्य देउन रुग्णांची सेवा करणाऱ्या राणे मल्टिस्पेसिएलिटी हॉस्पिटला शहरातील सर्वात स्वच्छ हॉस्पिटलचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

दरवर्षी आर्वी नगर परिषद अंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये नेहमीच स्वच्छतेला अग्रक्रम देणाऱ्या विविध संस्था, दवाखाने, शाळा इत्यादींचा गौरव करण्यात येतो. त्यातून बाकीच्यांना प्रेरणा मिळावा हा नगर परिषदेचा हेतू असतो. त्याच अनुषंगाने गेल्या चार वर्षापासून राणे मल्टिस्पेसिएलिटी हॉस्पिटलला प्रथम पुरस्कार देण्यात आला. उल्लेखनीय कामगिरी करणारे बहुधा हे पहिलेच रुग्णालय असेल.यावर्षी प्रजासत्ताक दिनी देखील वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र शासनाचे पशु संवर्धन व दुध्द विकास मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते कोरोना काळात उत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान करुन रुग्णांची सेवा केल्याबद्दल डॉ.रिपल राणे यांचा प्रजासत्ताक दिनी शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात सत्कार करण्यात आला . तसेच राणे हॉस्पिटल हे वर्ध्या जिल्ह्यातील एकमेव NABH प्रमाणित हॉस्पिटल असून रुग्णालया मार्फत देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेबद्दल नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे व उपस्थितांनी राणे मल्टिस्पेसिएलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.रिपल राणे डॉ. कालिंदी राणे यांच्या कार्याची प्रशंसा केली.
या प्रसंगी आर्वीचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांचे हस्ते राणे हॉस्पिटलचे संचालक डॉ.रिपल राणे यांचा प्रशस्तीपत्र देउन सन्मान करण्यात आला.यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष सौ. गिरी, नगरपालिका आर्वीचे आरोग्य सभापती प्रकाश गुल्हाने,डॉ.अरुण पावडे, डॉ. प्रतिभा पावडे ,आर्वीचे प्रतिष्ठित व्यापारी व नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
स्वछ सर्वेक्षण 2021 अंतर्गत राणे मल्टिस्पेसिएलिटी हॉस्पिटलला प्रथम पारितोषिक मिळाल्या बद्दल डॉ रिपल राणे यांनी नगरपालिका आर्वी यांचे मनस्वी आभार मानले व या प्रथम परितोषिकांचे श्रेय मी हॉस्पिटल मधील सर्व कर्माच्याऱ्यांना देतो असे या प्रसंगी प्रतिपादन केले.