वर्धा जिल्ह्यात २०१ ठिकाणी आंदोलन
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोबाईल वापसी आंदोलन — सुकूमार दामले
वर्धा:
केंद्र सरकारने पोषण टँकर एँप्स मराठीत करावे अन्यथा कामबंद प्रशासनाचे दडपण आणल्यास आयटक संलग्न अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन च्यावतिने १० जून ते १६ जून२० २१ कालावधीत राज्यभर एल्गार आंदोलन करुन शासनाने दिलेले मोबाईल प्रशासनास परत करण्यात येईल अशा इशारा राज्य अध्यक्ष सुकूमार दामले यांनी दिला

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) जिल्हा कमेटीची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष विजया पावडे होत्या. राज्य अध्यक्ष सुकूमार दामले, राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे ,आयटक राज्य सरचिटणीस शाम काळे, आयटक जिल्हा अध्यक्ष मनोहार पचारे, सहसचिव सुरेश गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन राज्य कमेटीच्या आवाहनानुसार १० जून ते १६ जून २०२१ जिल्हा परिषद व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय समोर मागणी सप्ताह आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .त्यानुसार वर्धा जिल्ह्यात २०१ ठिकाणी कोरोणाचे नियम पाळून करण्यात येईल अशी माहीती राज्य कार्याध्यक्ष काँ दिलीप उटाणे यांनी दिले.
केंद्र शासनाच्या जाचक अटींमुळे अंगणवाडी कर्मचारी मानधनापासून व
कुपोषित बालके आहारापासून वंचित राहण्याची शक्यता आहे,
महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर मराठी ऐवजी इंग्रजीत काम करण्याची सक्ती,
कोरोना काळातही केंद्र शासनाने लढण्याची वेळ आणल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.
अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
मागणी सप्ताह आंदोलन ,प्रशासनाच्या दडपणशाहीला बळी न पडता .यशस्वी करा,जे अधिकारी व पर्यवेक्षीका ञास देलील त्यांची त्यांच्या विरोधात जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंद करावी असे आवाहन करण्यात आले .
वर्धा जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्याने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष विजाया पावडे, जिल्हा सचिव वंदना कोळणकर, मंगला इंगोले, ज्ञानेश्वरी डंबारे, मैना उईके, सुनंदा आखाडे, माला भगत, विमल कौरती, प्रज्ञा ढाले , वंदना खोबरागडे, अल्का भानसे, शबाना खान, रेखा सिमा गढिया, रेखा कोठेकर, अंजली बोंदाडे, शोभा सायंकार, हिरा बावने, रेखा काचोळे, शोभा तिवारी , सुनिता टिपले, वंदना रेवतकर, कुसूम तडस, गिता पालीवाल, बबीता गायकवाड, माया डोईजोड, रुपाली खाडंवे ,मुक्ता हजारे, ज्योती कुलकर्णी, दुर्गा गवई, प्रतिभा नैताम, रंजना तांबेकर , सुनिता भगत इत्यादीने केले आहे.