Saturday, May 28, 2022
Homeवर्धाआदिवासी आयुक्त यांच्या सत्कार प्रसंगी कोडापे दाम्पत्याची विविध समस्येवर चर्चा

आदिवासी आयुक्त यांच्या सत्कार प्रसंगी कोडापे दाम्पत्याची विविध समस्येवर चर्चा

आष्टी : तालुक्यातील आदिवासी समाजाचे नामांकित व सेवारत शिक्षक दाम्पत्य म्हणून प्रसिद्ध असलेले वाल्मिकराव कोडापे व शालिनीताई कोडापे यांनी नागपूर येथील अप्पर आदिवासी आयुक्त रविंद्र ठाकरे यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला.

या प्रसंगी काही सामाजिक समस्येवर चर्चा करून निराकरण केले. त्यात खाजगी व शासकीय आश्रमशाळेतील अतिरिक्त शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी समुपदेशन,समायोजन बदली तात्काळ अमलात आणली त्यामुळे कर्मचाऱ्यांत उत्साहाचे वातावरण आहे. तर याच प्रसंगी आदिवासी सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ गोवारी जमातीला देण्यात येणाऱ्या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यात सर्वोच्च न्यायालयायाच्या अधीन राहून यापुढे गोवारी समाजबांधवाना आदिवासी सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. गैरआदिवासी अधिकारी कर्मचारी, आदिवासी खावटी वाटप योजनेवर चर्चा करण्यात आली. यावेळी उपायुक्त दशरथ कुळमेथी,आदिवासी उपायुक्त नयन कांबळे, कामगार उपायुक्त राजदीप धुर्वे उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular