ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू
हिंगणघाट:-
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वरील आंजती शिवारात आज सकाळी १० वाजताच्या सुमारास हिंगणघाट कडून जाम कडे राखळ भरून आणण्यासाठी जात असलेल्या खाली ट्रक्टरला मागून भरधाव वेगाने येत असलेल्या कंटेनर क्रमांक एच.आर.३८ वाय३६८९ ने जबर धडक दिली.या धडकेत ट्रक्टर चालक राहुल झाडे राहणार हिंगणघाट याला उपचारासाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी राहुल झाडे याला मुत्यू घोषित केले.

घटना स्थळी हिंगणघाट पोलिसांनी पंचनामा केला असता पुढिल तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.