Friday, June 9, 2023
Homeवर्धाआई-बाबा कोरोना केव्हा संपेल?

आई-बाबा कोरोना केव्हा संपेल?

लहानग्यांचा केविलवाणा प्रश्न; पालक ही खूप संभ्रमात
समुद्रपूर तालुका प्रतिनिधी
मुलांच्या जीवनात खेळ आणि सवंगडी यांना खूप महत्त्व असते.खेळामुळे मुलांचे आरोग्य व मन निरोगी राहते.बालकांना नैतिक धडे सर्वगड्या सोबत खेळातून मिळत असतात.खेळू व सवंगडीही बालकांच्या जीवनातील अभिभाग्य घटक आहेत.परंतु,कोरोणाच्या काळात मुले घरातच बंदिस्त झाली आहेत.अनेक दिवसांपासून त्यांना बाहेर सर्वगड्यासोबत मनसोक्त खेळायला मिळतच नाही.

घरात राहून कंटाळलेली बालके आपल्या आई-बाबांना कोरोना केव्हा संपेल? आम्हाला बाहेर खेळायला जायचे केविलवाना प्रश्न करताना दिसत आहेत.
. लहानपणी सामूहिक खेळातील जो आनंद आहे.तो पैशाने विकत घेता येत नाही.कोरोना संकटामुळे ही मुले खेळापासून दुरावले आहेत.अजान मुलांना स्वतःच्या घरातच कोरोनाने बंदिस्त करून ठेवले आहे.खेळ बंद, बाहेर फिरणे बंद,आप्तस्वकीकडे जाने बंद, शेजारी-पाजारी जाणे बंद यामुळे मुले कंटाळून गेली आहेत.घरातच राहून आई-बाबांना कोरोना कधी संपेल? आम्हाला खेळायला बाहेर जायचे आहे.या प्रश्नाने आई-बाबांही निरुत्तर झाले आहेत.कारण बाहेरची परिस्थिती खूपच वाईट व भीतीदायक झाली आहे.
घरातल्या घरात राहून ही मुले एकलकोंडी चिडचिड बनत चालली आहे आई-बाबांना नानाविध प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत. पहिल्या लॉकडाउनपासून मुले घरातच आहेत शाळा नाही,अभ्यास नाही,मित्र नाही व मैदानी खेळ नाहित यामुळे एकूणच मुलांची घर कोंडी झाली आहे.पहिल्या टाळेबंदित मुलांना थोडेफार खेळ खेळण्याची मुभा होती. आता मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बांधितांच्या मृतांची संख्या वाढत असल्यामुळे शहरे व गावे धास्तावून गेली आहेत.त्यामुळे लहान मुले घरातच बंदिस्त झाली व त्यांच्या खेळण्यावर वर बंदी आली आहे. कोरोना कधी जातो?आम्हाला आमच्या सवंगड्या सोबत केव्हा मोकळेपणाने क खेळायला मिळेल? तसेच आता घरी राहून कंटाळा आल्यामुळे शाळा कधी जाता येईल? याची मुले मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे.
पालकांचीही जबाबदारी वाढली बहुतांश मुली टीव्हीसमोर असतात, मोबाईल घेतात दररोजच्या या गोष्टीमुळे त्यांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होत आहे.ती टीव्हीसमोर बसून कार्टून पाहण्यात मुले दिवसेंदिवस घालवतानाचे चित्र पाहायला मिळते. मुलांच्या डोळ्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहेत. टीव्ही आनी मोबाईल तेच-ते दररोज पाहून मुले कंटाळूनही गेली आहेत. आपल्या मुलाची मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी पालकांची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. सध्याच्या काळात मुलांचे शाळा,खेळ, मित्र यापासून ते दुरावलेले आहेत. म्हणून पालकांना त्यांचे पालकत्व जपून त्यांचा शिक्षक,मित्र,मार्गदर्शक अशा विविध भूमिका साकार या लागत आहेत.मुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची झाली आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
- Advertisment -

Most Popular