Saturday, June 25, 2022
Homeवर्धाआंतरिक शक्ती मजबूत करा : डॉ. सत्यगोपाल जी

आंतरिक शक्ती मजबूत करा : डॉ. सत्यगोपाल जी

वर्धा : कोरोना काळात आलेले नैराश्य, भीती आणि उदासिनता दूर करण्यासाठी आंतरिक शक्ती मजबूत करुन स्वत:ला सर्जनात्मक कार्यात लावले पाहिजे असे विचार काशी हिन्दू विश्वविद्यालय, वाराणसीच्या डी. ए. वी. पीजी कालेजचे मनोविज्ञान विभागाचे अध्यक्ष प्रो. सत्यगोपाल जी यांनी व्यक्त केले. ते महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात गठित ‘कोविड टास्क फोर्स’ च्या वतीने “कोरोनाकालजनित उदासीनता,अनिश्चितता व तनाव” या विषयावर विशिष्ट आॅनलाइन व्याख्यानात मंगळवारी 8 जून
संबोधित करत होते.


ते म्हणाले, नकारात्मक वातावरणातून बाहेर निघण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करुन धैर्याने या बिमारीचा सामना केला पाहिजे. कोरोनाला एक सामान्य आजार समजून आपल्यातील आंतरिक शक्ती मजबूत केली पाहिजे व सृजनात्मक कार्यात व्यस्त ठेवले पाहिजे. कोरोना संकटात सोशल मीडियाची भूमिका यावर भाष्य करतांना ते म्हणाले, सोशल मीडियाने समाजावर सकारात्मक प्रभाव टाकला व एकापरिने बळ दिले. या काळात विविध सकारात्मक संदेशातून मदद पोचवण्याचे कामही सोशल मीडियाने केले. चिंता,अनिश्चितता व भीती घालवण्यसाठी अंतर्मन सक्रिय ठेवून आत्मबळ मजबूत करावे असा सल्लाही त्यांनी दिला.
अध्यक्षीय उद्बोधनात कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्ल म्हणाले, कोरोना संकटात आनंद देणारी साधने शोधून परस्पर व्यापक संवाद केला पाहिजे. तनावाने मनोदैहिक प्रक्रिया प्रभावित होते, अशात आपल्या आस्था मजबूत कराव्या. युवा व किशोर यांना कोरोनाच्या भयातून मुक्त करण्याचे मार्ग शोधले पाहिजे आणि यासाठी शिक्षकांनी संवादाची संस्कृती जपत विद्यार्थ्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे दायित्व निभविले पाहिजे असेही ते म्हणाले.
बीज भाषणात शिक्षण व मनोविज्ञान विभागाचे अध्यक्ष प्रो. गोपाल कृष्ण ठाकुर यांनी मानसिक व्याधिने ग्रसित लोकांबरोबर निरंतर संवाद केला पाहिजे असे मत मांडले.
स्वागत भाषणात प्र- कुलगुरु प्रो. चंद्रकांत रागीट यांनी कोरोना संकटात विश्वविद्यालयाने केलेले मदद कार्य तसेच टास्क फोर्सच्या आगामी कार्यक्रमाची माहिती दिली. परिसरातील गरजुंना हातमागाचे विनामूल्य प्रशिक्षण सुरु करण्यात येईल असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन व संयोजन दर्शन व संस्कृती विभागाचे अध्यक्ष डॉ. जयंत उपाध्याय यांनी केले. आभार
शिक्षण विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. मनोज कुमार यांनी मानले. डॉ. वागीश राज शुक्ल यांनी मंगलाचरण सादर केले. कुलगीताने कार्यक्रम प्रारंभ झाला. याप्रसंगी अध्यापक, शोधार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular