समुद्रपूर वर्धा रस्त्यावर वना नदीच्या काठावर लाखो ब्रास वाळू :अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज
समुद्रपूर
वना नदीपात्रात शासनाने लिलाव केलेल्या घाटात अवैद्यरिते उपसा करून लाखो ब्रास रेती वाळू सा८यांनी साठा करून ठेवला असून आठ ते नऊ किलोमीटर उपसा करून वाळूमाफियाने खुलेआम वाहतुक करीत शासनाचा लाखो रुपयांचा महसूल उडविला आहे त्यामुळे सदर वाळू माफिया विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.

वना नदी पात्रातील मांडगाव १ मणगाव घाटावर काही मोठया नेत्यानी समुद्रपूर वर्धा रोडवर जवळपास अर्धा किलोमीटर लांब व 30 ते 35 फूट उंच रेतीची साठवणूक केली आहे. तसेच वना नदीच्या काठावर बाजूच्या शेतामध्ये लाखो ब्रॉस रेतीचा अवैद्य साठा केला आहे.
सदर हा वाळू साठा वर्धा येथील राजकीय नेत्याचा असल्यामुळे उपविभागीय अधिकारी तहसीलदार सदर वाळूसाठी याकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे रस्त्यावर असलेल्या अवैध वाळू साठे जप्त करण्याचे काम तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार व महसूल प्रशासनाचे अधिकार्याचे असून सुद्धा संबंधित अधिकारी सदर वाळू साठा जप्त का करीत नाही असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये उपस्थित होत आहे रस्त्याचे बाजूला खुल्या जागेत असलेल्या वाळूसाठी आला महसूल
प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची तर मूकसंमती आहे का असे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे तर वर्धा समुद्रपूर रोडवर बाजूच्या शेतात लाखो ब्रोस साठे महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिसत नसावे का? तसेच दिसल्यानंतर ही त्यासाठी याकडे अधिकारी दुर्लक्ष तर करीत नाही ना ?याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सदर विषयात आता जिल्हाधिकारी लक्ष घालण्याची गरज असून स्वतः समुद्रपूर वर्धा रोडवरील व नदीच्या काठावर असलेल्या शेतातील लाखो ब्रास रेतीची अवैधरित्या साठेबाजी करणाऱ्या ठिकाणावर येऊन रेती माफिया विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
पावसाळ्याची नियोजन
उन्हाळ्यात नदीचे पात्र कोरडे असते त्यामुळे वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जातो. आता पावसाळा सुरू झाला असून नदीपात्रातून रेती काढता येत नाही त्यामुळे वाळू माफियांया रेतीचा एखाद्या सुरक्षित ठिकाणी साठा करून ठेवतात व नंतर वाळू घाट सुरू होईपर्यंत वाळूची विक्री करतात. दरम्यानच्या काळात चढ्या दराने वाळू विक्री केली जाते.