Monday, June 27, 2022
Homeवर्धाअल्पभूधारक शेतकऱ्याने घेतले पपई चे विक्रमी उत्पादन

अल्पभूधारक शेतकऱ्याने घेतले पपई चे विक्रमी उत्पादन

कलगाव येथील युवा शेतकरी प्रमोद आंबेकर यांचे प्रयत्न

दिग्रस : तालुक्यातील शेतकरी आता प्रयोगशील झाला आहे. नवीन पिढीतील युवा शेतकरी पारंपरिक पिकाला फाटा देऊन नवीन प्रयोग करताना दिसत आहे. दिग्रस तालुक्यातील अशाच एका युवा शेतकऱ्याने विमा संरक्षण नसतांना देखील आपल्या शेतीत वेगळी वाट निवडूण पपईचे भरघोस उत्पादन घेतले आहे. तालुक्यातील कलगांव येथील शेतकरी प्रमोद केशवराव आंबेकर या युवा शेतकऱ्याचा प्रवास नक्कीच युवा शेतकरी वर्गाला प्रेरणादायी ठरणारा आहे.


दिग्रस पासून दहा किलोमीटर अंतरावर लाख रायाची फाट्याजवळ महामार्गाला लागून अडूसष्ट वर्षीय केशव आंबेकर पपई विक्री करताना दिसतात. झाडाला पिकलेली गुलाबी टवटवीत आणि ताजी पपई पाहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांचे व वाटसरू चे पाय थांबवून घेते. आलेल्या ग्राहकाला आधी पपई कापून स्वाद घेण्याचा आग्रह करतात आणि ठराविक दराने विक्री करतात. शेतकरी ते ग्राहक पर्यंतचा थेट व्यवहार येथे प्रत्यक्ष पाहायला मिळतो. युवा शेतकरी प्रमोद केशवराव आंबेकर याने आपल्या वडिलोपार्जित चार एकर शेतीमध्ये पपईची एक हजार झाड़े लावली. त्यातून भरघोस उत्पन्न घेत आहे. उत्पादित पपई ठोक मध्ये न विकता बाजारापेक्षा कमी दराने थेट ग्राहकाला विकण्याचे ठरविले. आपल्या शेता जवळून जाणाऱ्या महामार्गाच्या कडेला दुकान लावून विक्री करण्याचे ठरविले. यातून दूहेरी फायदा झाला. एकतर ग्राहकाला बाजार भाव पेक्षा कमी दराने आणि कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता नैसर्गिक स्वरूपात पपई मिळाली तर दुसरीकडे प्रमोद आंबेकर याला देखील ठोक मध्ये विक्री ऐवजी कमी दराने विक्री करून जास्त लाभ मिळाला. प्रमोद चा इथ पर्यंतचा प्रवास देखील तेवढाच खडतर व रंजक आहे. परंपरिक पीक घेऊन घरखर्च भागत नाही म्हणून त्याने शेती मकत्याने दिली होती. त्यातून मिळालेल्या पैशात उसनवारीचे पैसे टाकून ऑटो घेतला होता. परंतु वडीलाची तब्येत खराब राहत असल्याने कमाईचा पैसा पुरत नव्हता. त्यामुळे त्याने आपल्या शेतातच काहीतरी नवीन प्रयोग करायचे ठरविले. त्या करिता हाती पैसा नव्हता. मग घेतलेला आटो विकून शेतीमध्ये फळबाग लागवड करायचे ठरविले आणि केळी लागवड केली. परंतु येथे ही बाप लेकाची काळजी वाढविणारी बाब पुढे होतीच. फळबाग लागवड केल्याच्या अगदी दोन-तीन दिवसातच कोरोना प्रादुर्भाव मुळे लॉक डाऊन करण्यात आले. लॉकडाऊन चा कालखंड जवळपास सात महिने राहिला. दरम्यान काळात आता आपले पिक आणि उत्पादित फळे विक्री कशी करावी हा मोठा प्रश्न होता. व्यापाऱ्यांनी पडल्या दराने मागणी केली. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतः पपई विकायचे ठरविले. त्यांच्या प्रयत्नाला यश देखील आले. ठोक बाजारांमध्ये ते जेवढया रुपयाची पपई विक्री झाली असती त्यापेक्षा किती तरी जास्त पैसा आज त्यांना मिळाला आहे. अजून अर्धे उत्पादन झाडावर आहे. त्यांच्या प्रयत्नाला यश आले. ग्राहकाला उत्कृष्ट पपई मिळू लागली. शिवाय चार लोकांना रोजगारही दिला.
आपण म्हातारे झालो तरी आपल्या मुलाबाळांना शेतीकामात हातभार लावा. आपल्याने जेवढे होते तेवढे करावे. मुलांना शेतीत नवनवीन प्रयोग करण्यास प्रोत्साहित करावे. असे वडील केशव आंबेकर म्हणतात. त्यांचे हे प्रयत्न निश्चितच युवा शेतकऱ्यांकरिता प्रेरक आहे.

   आधी ऑटो चालवायचो पण लॉकडाऊन लागल्यापासून ऑटो बंद होता. त्यामुळे मी शेतीकडे वळलो. कोणतेही विमा संरक्षण नसतांना जोखीम पत्करून मी शेतात पपईची लागवड केली. त्यातून मला चांगले उत्पन्न मिळाले परंतु जर कोणती नैसर्गिक आपत्ती आली असती तर माझे पुर्णतः नुकसान झाले असते. मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला असता. पपई सारख्या अनेक पिकांना अद्याप कोणतेही विमा संरक्षण नाही त्यामुळेच अशी पिके घेतांना अनेक शेतकरी विचार करतात. त्यामुळे शासनाने पपई व अशा इतर पिकांना विमा संरक्षण द्यावे जेणेकरून युवा शेतकरी नगदी पिके वगळता इतर पिकं घेण्याकडे वळतील. 

प्रमोद आंबेकर, युवा शेतकरी कलगाव, ता.दिग्रस

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular