Saturday, June 25, 2022
Homeवर्धाअपात्र शेतकऱ्यांना पुनर्गठण करुन चालू हंगामात नव्याने पिक कर्ज उपलब्ध करुन द्यावे…

अपात्र शेतकऱ्यांना पुनर्गठण करुन चालू हंगामात नव्याने पिक कर्ज उपलब्ध करुन द्यावे…

मुख्यमंत्री यांना निवेदन सादर

वर्धा :
मागील वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन पिकांची संपूर्णता नुकसान झालेले आहे. तसेच कपाशीवर बोंडअळी आल्यामुळे कापसाचे सुध्दा उत्पादन घट झाली. मागील वर्षी कोरोना काळ असतांना सुध्दा शेतमजुरांना शेतात काम देऊन त्यांचा उदरनिर्वाह करण्याचे काम शेतकऱ्याने केलेले आहे. नापीकीमुळे बँकेचे पीक कर्ज शेतकऱ्याने भरलेले नाही. त्यामुळे चालु वर्षाच्या हंगामात आपण सर्व बँकांना निर्देश देऊन पीक कर्ज वाटपाची टक्केवारी वाढविण्यास सांगावे.अशी मागणी राष्ट्रवादी किसान मोर्चा च्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.


हवालदिल शेतकऱ्यांचे मागील वर्षाचे कर्ज माफ करावे जेणे करुन अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नैराश्यपोटी आत्महत्या होत आहे ते रोखण्यासाठी सरकारने सन 2020-21 या हंगामात शेतकऱ्यांनी घेतलेले सरसकट पीक कर्ज माफ करण्याबाबत व चालू हंगामात नव्याने पीक कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत मोलाची भूमिका निभावुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्वजी ठाकरे यांना पाठविण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते किशोर किनकर, राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष संजय काकडे, राष्ट्रवादी ग्राहक सेलचे अध्यक्ष विनोद पांडे, जिल्हा उपाध्यक्ष संदिप भांडवलकर, निरजभाऊ चोरे, शरद कांबळे, वासुदेव कोकाटे, प्रशांत महल्ले, राजेश धोटे, नितीन देशमुख, संजय मोडक इत्यादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular