नाभिक महामंडळ महिला आघाडीचा उपक्रम
वर्धा : जागतिक महिला दिन सर्वत्र विविध उपक्रमाने जिल्ह्यात साजरा करण्यात आला .मात्र वेगळ्या उपक्रमाने अनाथ महिला मुलींच्या सोंदर्यात भर घालणारा उपक्रम आज वर्ध्यात एका नाभिक महिला संघटनेने केल्याचे बघायला मिळाला. या उपक्रमाचे सर्वत्र कॊतुक केल्या जात आहे .

वर्धा सलून ब्यूटी पार्लर असोसिएशन व महाराष्ट्र नाभिक महामंडळ महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन केशवसिटी वर्धा येथील अनाथ आश्रमातील मुलांची व मुलीची हेअर कटींग मोफत करून महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी आश्रमातील सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.
या कार्यक्रमला महिला आघाडी पदाधिकारी प्राज्ञा अतकर, शिल्पा येउलकर, योगिता राजूरकर, दुर्गा वाटकर,मंगला अतकरे, वंदना जांभुळकर, पुष्पलता आतकर, जयश्री वाटकर उपस्थित होते या कार्यक्रम सलून ब्युटी पार्लर असोसिएशन कार्यकर्ते लीलाधर येउलकर, विवेक अतकर, सहदेव वाटकर, उमेश किनारकर, प्रदीप वाटकर सलून दुकानदार व कारागिर सहकार्य केले.