Tuesday, June 28, 2022
Homeवर्धाअंगणवाडी कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन मिळालीच पाहिजे आयटकने दिले प्रकल्प अधिकारी मार्फत निवेदन

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन मिळालीच पाहिजे आयटकने दिले प्रकल्प अधिकारी मार्फत निवेदन

वर्धा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर मासिक पेन्शन देण्यात यावी या मागणीसाठी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन च्यावतिने वर्धा१ प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी कल्पना पांडे (माळोदे) यांना मुख्यमंत्री यांच्या नावाने निवेदन शुक्रवार (८) रोजी जिल्हा सचिव वंदना कोळेणकर तर हिंगणघाट प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी चिरुटकर यांना काँ ज्ञानेश्वरी डंभारे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

एकात्मिक बालविकास सेवा योजना २ ऑक्टोबर १९७५ रोजी सुरू झाली. २०२०मध्ये या योजनेला ४५ वर्ष पूर्ण झाली. अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी आपल्या रक्ताचे पाणी करून लाभार्थ्यांना सेवा दिली. या योजनेचा पाया रचणाऱ्या आपल्यातील अनेक कर्मचारी कोणत्याही लाभाशिवायच ६५ वयानंतर रिकाम्या हाताने घरी गेल्या. २००३ पासून सातत्याने लढा दिला, संप केले तर याच मागणी साठी नागपूर विधानसभेवर भंडारा ते नागपूर पायी मोर्चा काढून दोन दिवस थंडीत मुक्कामी आंदोलन केले होते तेव्हा कुठे २०१४ मध्ये एकरकमी सेवा समाप्ती लाभ पदरात पडला. परंतु त्यामध्ये मिळणारी १ लाख व ७५ हजारांची रक्कम आपल्या म्हातारपणाचा आधार बनण्यासाठी पुरेशी नाही. आपल्याला गरज आहे तहहयात मासिक पेन्शनची. म्हणूनच कृती समितीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने ४ जानेवारी २०२१ पासून रोज वेगवेगळ्या ठिकाणी प्रामुख्याने खालील मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे
गेल्या २,३ वर्षांपासून निवृत्त झालेल्या किंवा मयत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थकित सेवा समाप्ती लाभ त्वरित अदा करण्यात यावा.
एकरकमी सेवा समाप्ती लाभ कायम ठेवून त्या व्यतिरिक्त सेविका मदतनिसांना त्यांच्या शेवटच्या मानधनाच्या निम्मी रक्कम मासिक पेन्शन स्वरूपात तहहयात देण्यात यावी.
भविष्यात कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झाल्यास पेन्शनमध्ये त्या वाढीच्या निम्या रकमेची वाढ करण्यात यावी.बालविकास प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देतांना मैना उईके वंदना कोळनकर ज्ञानेश्वरी डंभारे शोभा सायंकार अरुणा नागोसे गोदावरी राउत सुषमा ढोक अर्चना मुडे इरफाना पठाण गायत्री चाचेरे नंदा वाळके रोशनी कूजेकर रंजना डफ चंदा अतकरे शोभा बोंद्रे माधूरी मुडे शुभांगी बांगडे कोमल कोल्हे मनिषा सुटे सुनिता म्हैसकर मनिषा राऊत शिला खडतडे सूमन कनाके जोसना बोरकुटे प्रमिला कांबळे , शुभांगी काळे, रुंद भोंगडे ,जोसना पुसदेकर, कल्पना सावरकर इत्यादीचा समावेश होता.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular