Tuesday, June 28, 2022
Homeवर्धाअंकिता जळीत प्रकरणात बचाव पक्षाचे अँड. सोने आज न्यायालयात प्रत्यक्ष हजर

अंकिता जळीत प्रकरणात बचाव पक्षाचे अँड. सोने आज न्यायालयात प्रत्यक्ष हजर

हिंगणघाट

         अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणातील मुख्य आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे ह्याला आजही न्यायालयात हजर केले असता न्यायालयात सादर केलेल्या दत्ता शामराव आंगरे व प्रविण पाडुरंग पानवडे यांच्या  पुर्न  तपासणीचे अर्जावर युक्तिवाद नोंदविण्याकरिता हे प्रकरण लांबणीवर पडले आहे यावेळी बचाव पक्षाचे वकील अँड. भुपेन्द्र सोने हे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आज प्रत्यक्ष हजर झाले होते, पण कोरोनाचे प्रादुर्भावित संक्रमणापासून बचावाचा उपाय करण्याकरीता न्यायालयीन कामकाजात विडीयों काँप्रेसिंग द्वारे सुनावणी घेण्यात यावी असा नागपुर खंडपीठाचा आदेश असल्याने आज प्रत्यक्ष अँड. सोने न्यायालयात हजर राहूनही काहीच कामकाज होऊ शकले नाही,  जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.एन.माजगावकर यांनि पुढिल सुनावणी १४ जूनला विडीयों काँप्रेसिंग द्वारा होईल , असे निर्देश देण्यात आल्यामुळे आज कोणतेही कामकाज ह्या प्रकरणी झाले नाही. सरकार पक्षातर्फे खटल्यातील सरकारी पक्षाचे वतीने नामवंत विधीतज्ञ निकम यांचे सहकारी अँड. दिपक वैद्य प्रत्यक्ष  न्यायालयात हजर होते.
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular