Monday, June 27, 2022
Homeयवतमाळसार्वजनिक शौचालय बंद असल्याने स्वाभिमान मुख्याधिकाऱ्यांना संडासची शीट भेट

सार्वजनिक शौचालय बंद असल्याने स्वाभिमान मुख्याधिकाऱ्यांना संडासची शीट भेट

स्वाभिमानच्या अनोख्या आंदोलनाने प्रशासनाची उडाली भांबेरी

यवतमाळ : शहरातील दारव्हा रोड वरील नेताजी नगर भागातील सार्वजनिक शौचालय गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे. स्वाभिमान कामगार संघटनेचे अध्यक्ष निरज वाघमारे यांनी नगरपरिषद मुख्याधिकार्‍यांना संडासच्या शिटवर निवेदन लिहीले. नगरपालिकेच्या अकार्यक्षम व हलगर्जीपणाचा निषेध करत या प्रश्नाकडे कडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.’


नेताजी नगर येथील शौचालये पूर्णपणे दुरुपयोगी ठरत असल्याने बंद अवस्थेत आहे. यामुळे येथील महिलांना व रहिवाश्यांना शौचाकरीता उघड्यावर जावं लागतं आहे. नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधीना लेखी व तोंडी तक्रारी सुद्धा केल्या मात्र त्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने अखेर स्वाभिमान कामगार संघटनेचे अध्यक्ष निरज वाघमारे यांच्या सह सहकाऱ्यांनी यवतमाळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुनिल बल्लाळ यांना संडासच्या शिटवर निवेदन देऊन हे शौचालय पूर्ववत करून येथील संरक्षण भिंत उंची वाढवावी अशी मागणी या निवेदनातून केली. यावेळी स्वाभिमान कामगार संघटनेचे वसीम पठाण, रोशन मस्के, सूरज मेश्राम, नितेश बहाळे, ऋषिकेश सवळे,शुभम गणवीर, वैभव धामनवार,प्रणव राठोड, कमलेश सवळे, अमोल मसराम, तौफिक पठाण, अरमान खान, साहिल खान, गोलू शेख, यश किर्तक, राहुल प्रधान,रोहन ढाकरगे, क्षितिज रुपवणे, साहिल खान, राजू कांबळे, महादेव संत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट
तर शौचालय करिता मुख्याधिकाऱ्यांच्या निवास्थानी जाऊ

 स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतर ही मूलभूत गरजांसाठी अश्याप्रकारे आंदोलन करावी लागत असून ही फार मोठी शोकांतिका आहे. आज नेताजी नगरातील सार्वजनिक शौचालयचा प्रश्न गहन बनला असून यामुळे आमच्या माता - भगिनींना संडाससाठी उघड्यावर जावं लागतं आहे. यामुळे हे सार्वजनिक शौचालय  लवकरात लवकर चालू व्हावे यासाठी आज मुख्याधिकाऱ्यांना शिटवर निवेदन देऊन आंदोलन केले आहे आमची ही मागणी पूर्ण न झाल्यास यापुढे हा लढा तीव्र करून आम्ही शौचालय करिता मुख्याधिकाऱ्यांच्या निवास्थानी जाऊ.
  • निरज वाघमारे
    अध्यक्ष, स्वाभिमान कामगार संघटना, यवतमाळ
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular