यवतमाळ : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी शेतकरी युवा एल्गार संघटेने नेर येथ उपोषणाला सुरूवात केली आहे.

शेतक-यांच्या विविध मागण्याचे निवेदनही तहसीलदारांना दिले आहे. केंद्र सरकारने 2020 सालात किसान विरोधी केलेले कायदे करूंन शेतक-यांनी न्याय दावा, स्वामिनाथन आयोग त्वरित लागू करा, शेतक-यांना भांडवलदार वर्गाच्या घशात घालण्याचा कुटील डाव हानुन पाडावा अशी मागणी शेतकरी युवा एल्गार संघटनेने केली आहे. २३ डिसेंबर पासून शेतकरी युवा एल्गार संघटनेचे अध्यक्ष धनंजय वानखडे यांचा मार्गदर्शन उपोषण सुरू आहे. या आंदोलनात अंकुश राउत यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले आहे.