Monday, June 27, 2022
Homeयवतमाळविनापरवानगी रेती वाहून नेणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर कार्यवाही

विनापरवानगी रेती वाहून नेणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर कार्यवाही

महागाव पो.स्टे.मध्ये गुन्हा दाखल

महागाव

अवैध उत्खनन करून विनापरवानगी रेती वाहून नेणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महागाव पोलिसांनी कार्यवाही केली आहे.ही कार्यवाही थार गावाजवळ आज ता.२२ च्या मध्यरात्री करण्यात आली असून दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमोल मारोती वानखेडे ,विवेक कैलास पाचकोरे रा.हिवरा असे संशयित आरोपीचे नाव आहे.

महागाव पोलीस रात्री गस्तीवर असताना महागाव तालुक्यातील थार गावाजवळ ट्रॅक्टर क्र. एमएच २९ सी ५०६२ व ट्रॅक्टर एम एच २९ बिसी ८०४० अवैध उत्खनन करून रेती वाहून नेत असल्याची माहिती महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास चव्हाण यांना मिळाली.त्यावरून महागाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेतले.पोलीस असल्याचा सुगावा लागताच ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर सोडून घटनास्थळावरून पसार झाले. ट्रॅक्टरची पोलिसांनी चौकशी केली असताना प्रत्येकी एक ब्रास असे एकूण दोन ब्रास अंदाजित किंमत १२ हजार पोलिसांनी ताब्यात घेतले.त्यानुसार महागाव पोलिसांनी भादवी कलम ३७९,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular