Monday, June 27, 2022
Homeयवतमाळलोणी येथे नामविस्तार दिन साजरा

लोणी येथे नामविस्तार दिन साजरा

पुसद : येथील (लोणी) भिमवाडी येथे भीम पँथर न्यायाची डरकाळी सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजन करण्यात आले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष भीम पँथर महिला आघाडी सारुबई केवटे, प्रमुख पाहुणे वंदना मनवर,साधना गजभार,वर्षा केवटे, भैया मानकर यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक त्रिशरण पंचशील घेतले. भिम पँथर महिला आघाडी साधना गजभार यांनी आपले विचार व्यक्त केले. भिम पँथर महिला आघाडी सरुबई केवटे यांनी सुद्धा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील 14 वर्ष नामविस्तार लढायांमध्ये शहीद झालेल्या गौतम वाघमारे व अन्य भीमसैनिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली. त्या म्हणाल्या की, आपल्या समाजाचा इतिहास आहे,की कोणत्याही कार्यक्रमाच्या उत्साह माघे समाजाचे बलिदान लपलेलं असते,आणि त्याचप्रमाणे आजच्या नामविस्तार दिनाच्या उत्साह माघे ज्या शूरवीर भीमसैनिक यांनी व भिम पँथर महिलानी आपले बलिदान देऊन विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद विद्यावपिथाचे नामांतर मिशन कमयाब केले. संचालन पॅंथर चंदूभाई दूमारे यांनी केले,या कार्यक्रमाचे आभार संदीप गजभार यांनी केले,या कार्यक्रमाला अत्थक परिश्रम आशाबाई केवटे, आम्रपाली खंदारे, रमाबाई कांबळे,समीक्षा धुळधुळे,साधना केवटे,प्रतीक्षा वाघमारे,पल्लवी खंदारे,आविका केवटे, यश गजभार प्रथम केवटे, निखिल कांबळे,प्रथम गजभार,अधिराज धुळधुळे, है उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular