Monday, June 27, 2022
Homeयवतमाळराळेगाव तालुक्यात भाजपाचा झेंडा

राळेगाव तालुक्यात भाजपाचा झेंडा

60 % ग्रामपंचायतीत भाजपाचे बहूमत

राळेगाव : तालुका भारतीय जनता पार्टी च्या वतीने राळेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने लढविण्यात आल्या. ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून बहुतांश ग्रामपंचात वर भाजपाचे उमेदवार विजयी झाले.


तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीपैकी एक वनोजा ग्रामपंचायत भाजपाची अविरोध आली.46 ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपाचा झेंडा 60 % ग्रामपंचायत वर फडकला आहे. 27 ग्रामपंचायत बहूमताने निवडूण आल्या. एकूण ग्रामपंचायत सदस्या पैकी भाजपाचे 180 पेक्षा अधिक सदस्य निवडूण आले.
राळेगाव तालुक्यातील मातब्बर काँग्रेस नेतृत्वाचा पराभव करीत आपटी, चहांद, धानोरा, गुजरी, लोहारा, नागठाणा, निधा, पिंपळखुटी, सरई, सोनुर्ली, टाळकी, तेजनी, वालधूर, वाऱ्हा, वरणा, वरूड, झाडगाव, आंजी, आष्टोणा, भांब, बोरी ई.,दहेगाव, खडकी,वाढोणा बा.,वेडशी,कळमनेर या सर्व ग्रामपंचायतीवर भाजपा चा झेंडा फडकला.राळेगाव विधानसभेचे आमदार प्रा डाॅ अशोक उईके यांच्या नेतृत्वावर ग्रामपंचायत निवडणूकीत मतदारांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular