Tuesday, June 28, 2022
Homeयवतमाळमाजी जि. प. सभापती पॅनलचा दणदणीत विजय

माजी जि. प. सभापती पॅनलचा दणदणीत विजय

मुळावा: स्थानिक मुळावा ग्रामपंचायतच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गटबाजीमुळे दोन पॅनल आमने-सामने झाले.त्यामुळे तालुक्याचे लक्ष मुळावा ग्रामपंचायतीच्या निकालाकडे लागले होते. यावेळी माजी. जि. प. सभापती विरूद्ध पं. स. सभापतीचे पॅनल होते. त्यात जनतेने माजी. जि. प. सभापती तातु देशमुख यांच्या एकता पॅनल ला कौल देऊन बहुमताने विजयी केले.


मुळावा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माजी जि. प. सभापती व पं. स. सभापती यांनी आपआपले वेगळे पॅनल तयार केले होते . त्यामुळे ग्रामपंचायत निवडनुकीत मतदारांसमोर संभ्रमावस्था निर्माण झाली. 18 जानेवारी रोजी झालेल्या मतमोजणीमध्ये मतदारांनी तातु देशमुख गटाला कौल देऊन 15 पैकी 14 उमेदवार निवडुन देऊन ग्रामपंचायतीवर वर्चस्व अबाधीत ठेवले.
या निवडणूकीमुळे प्रामुख्याने कॉंग्रेसचे दोन गट एकमेकाविरुदध उभे राहीले . मुळावा ग्रां पं . गेल्या पन्नास वर्षापासुन देशमुख घराण्याच्या ताब्यात आहे .तातू देशमुख यांना मतदारांच्या आशिर्वादाने पुन्हा एकदा ग्रामपंचायती मध्ये आपल्या गटाच्या सत्तेची चावी आपल्या हातात ठेवण्यात यश मिळविले आहे .

चौकट
दोन गटात दगडफेक व हाणामारी


मुळावा येथे तातूजी देशमुख यांच्या एकता पेनलच्या विजयी मिरवणुकीत दरम्यान उमरखेड प. स. सभापती प्रज्ञानंद खडसे यांच्या घराजवळ दगडफेक व हाणामारी झाली. या मध्ये माजी सरपंच प्रविण खडसे व तिन जण जखमी झाले. या मुळे मुळावा येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोरोनाचे सावट आचारसंहिता आस्तांनी मिरवणुकीची परवाणगी दिली असा सवाल उपस्थित होते आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular