महागाव : तालुक्यात येत असलेल्या भोसा महामार्ग पोलीस चौकी कडुन रस्ता सुरक्षा अभियान २०२०-२०२१ राबविण्यात येत आहे. वाहन चालकांनी आपली वाहने भरधाव वेगात न चालवता सुरक्षित पणे प्रवास करावा.त्यामुळे इंधनाची बचत सुद्धा होईल.

प्रदूषण विरहित वाहन आजार विरहित जीवन हरित पृथ्वी हरित जीवन. अपघात अश्रू आणतो मात्र सुरक्षा आंनद देते असे ब्रीद वाक्य अवलंबून महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२०-२०२१ राबविण्यात येत आहे. या सप्ताहात वाहन चालकांनी सुरक्षा बाळगावी असे अहवान महामार्ग पोलीस उपनिरीक्षक प्रेमदास आडे यांनी केले आहे.रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटक म्हणून अनिता तिवारी, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोर जगताप पोलीस पाटील भोसा हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय भारती उपस्थित होते. या सप्ताहाचे सूत्रसंचालन गुणवंत बोईनवाड यांनी केले. तर आभार पोलीस उपनिरीक्षक आडे यांनी मानले. यावेळी भाऊराव नैताम, सय्यद जावेद, योगेश मसराम, रमेश राठोड, रुपेश तिआरे हे उपस्थित होते.