बिटरगाव पोलिसांना निवेदन
ढाणकी : भोकर तालुक्यातील पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून खून केल्याच्या घटनेच्या निषेध करण्यात आला. येथील आदिवासी मन्नेरवारलू समाज व ढाणकी वांशीयांनी बिटरगाव पोलीस स्टेशन मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील दिवशी या गावातील एका पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून खून केल्याची घटना घडली. या घटनेने संतापाची लाट उसळली असून निषेध नोंदविला. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी व या प्रकरणी तात्काळ सुनावणी करून आरोपीला फासावर लटकावावे या अशायचे निवेदन आदिवासी मन्नेरवारलू समाज व ढाणकी वाशी यांनी बिटरगाव पोलीस स्टेशन यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पुंजाराम मुतुलवाड, अवधूत गंगरपाड, सचिन तोटेवाड, अनिल गंगरपाड, मारोती कायपलवाड, वसंत फुलकोंडवार,अशोक कुंबरवार,दत्तात्रय दर्शनवाड,संजय कुंभरवार,गोपाल गौरवाड, सुनिल कुंबरवार, रवि चव्हाण, पंकज केशेवाड, प्रकाश जयस्वाल, दिगंबर बल्लेवार, उमेश योगेवार,राम सोनुने, समाधान काळे,साईनाथ धोपटे,संतोष रावते,सुमित मुखिरवाड,विजय कुंबरवार, दयानंद महाजन,अविनाश कुंबरवार, कैवल्य तोटेवाड,मारोती गंगरपाड,विनोद माहेश्वरी,कुरेशी सत्तार,बंटी जाधव, संभाजी गोरटकर,विशाल नरवाडे, आभय सोनुने, रमेश चिंचोलकर उपस्थित होते.